shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एक कारण पाहिजे..!

तिच्याशी भांडण्यासाठी मला एक कारण पाहीजे
तिच्या डोळ्यांच्या आत मला एक तुडुंभ भरलेले धरण पाहीजे

जगण्या सारखं होतं मला मस्तीत जगता आले कुठे
तासुन घेतले मी शब्द मला आता ईच्छा मरन पाहीजे

बोलुन बदलत नाही पाषानालाही घडवावेच लागते
अर्जीव करुन कर्ज भेटणार नाही माला तुच तारन पाहीजे

फक्त नियोजन करुन व्यापार होत नाही
तोटा होवु द्या कितीही संय्यम अन धोरन पाहीजे

नसेल मिठ मिर्चीला खर्चायला घरात फुटकी कवडी
शब्दांची दौलत उधळणारा धुरंदर दिलदार सधन पाहीजे

भेटवस्तु देवुन प्रेम भेटत नाही ना मागता येते ना शेवट होतो
लग्न हा तडजोडीचा करार आहे प्रेमात दोघेही मस्तवाल मदन पाहीजे

सुविचार भिंतीवर लिहुन कुठे परीवर्तण घडते
संघर्षात आयुष्य उधळुन देणार्या विचारांच्या शस्ञांचे साधन पाहीजे

रक्तात भिनल्यावरच मी काळजात घोळ घालणारे शब्द बाहेर काढतो
मला शब्दांना धुवुन स्वच्छ करणारा खुद्दारीचा साबन पाहीजे

तिच्याशी भांडण्यासाठी मला एक कारण पाहीजे
तिच्या डोळ्यांच्या आत मला एक तुडुंभ भरलेले धरण पाहीजे
आकाश सुपारे
9822510254
close