रमजान मुबारक २०२३ - रोजा नं. ६,
बुधवार दि.२९-०३-२०२३
*"इस्लाम समजून घेताना"
लेखक डॉ सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर
मोबा : ९२७१६४००१४
अबु हुरैरा रजि.हे प्रेषीत मुहम्मद स्व-सल्लम .यांचे खास सहकारी सांगतात , प्रेषीत मुहम्मद स्व- सल्लम नी सांगितले की," रोजा एक प्रकारे गुन्हा न करण्याची " ढाल" आहेत,कारण रोजाच्या स्थितीत तुम्ही कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी, गुन्हांची कामे करुच शकत नाही, ; गुन्हांचे करण्याचे विचार सुध्दा करु शकत नाही .,.कोणी तुमच्या बरोबर भांडणं - शिवीगाळ करत असेल तर, त्या व्यक्तीस सरळ सांगा की , " मै - रोजे- से - हुं " तर समोरील व्यक्ती शिवीगाळ-अपशब्द- भांडण करणारा गुन्हाच करणार नाहीत, जर हे जाणून ही त्याने अपशब्द वापरले तर ; ती व्यक्ती फार मोठ्या पापांचे भागिदार होईल."( सहीह बुखारी हा.न.१८९४).
नकळतपणे जे बंधुं -मित्र सिगारेट ओढत असतील, तंबाखूचे- गुटखा - बार - हिरा पुडी - चरस -गांजा -अफू - च्या आहारी गेलेले असतील, दारु पिऊन पडत असतील किंवा अनेक व्यसनांच्या आहारी गेलेले असतील, व्यसनाधीन झालेली असतील,त्यांच्यामुळे घरातील मंडळी त्रस्त झालेल्या असतील ,घरांची पैशाची राखरांगोळी केलेली - झालेली असेल, आशा बांधवांना, मित्रांना, रुग्णांना रमजान मुबारक महीना एक संधीच काळ चालून आलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या खर्चाची गरज नाही, कुठल्याही प्रकारच्या मोटीवहेशनल लिडर- माणसाची - संमोहन तज्ञांची मदती शिवाय आपल्याला जडलेल्या घाणेरड्या व्यसनं सोडण्याची सुवर्ण संधी सध्या चालून आलेली आहेत.
फक्त - फक्त गरज आहे एका पक्या मनापासून विचार करून इच्छा शक्ती निर्माण करण्याची ..
फक्त एकदा विचार करा .... अल्लाहच्या भरवश्यावर व्यसनं सोडण्यास मनोमन तय्यार व्हा...आज संधी उपलब्ध आहेत .
संपूर्ण रमजान महिन्यातील अनिवार्य (फर्जं) केलेले पवित्र रोजे (उपवास) आहेत. अल्लाहला संपूर्णपणे शरण जाणे, अल्लाहवर नितांत निष्ठा ठेउन सदाचाराने वागण्याची शपथ घेवुन आपल्या दुसऱ्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या मित्रांनाही या चांगल्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करा.
कारण अल्लाह (ईश्वर) हा ईस्लाम धर्माने वर्णिलेला परमेश्वर (अल्लाह) हा कोणत्याही एका राष्ट्राचा किंवा धर्माचा नसुन , तो सर्व व्यापी सर्व जगाचा रब्बुल आलमीन आहेत, म्हणजेच पसायदानामध्ये संत ज्ञानेश्वरांनी आळविलेला "विश्वात्मक"असेच म्हणावे लागते , ,संपूर्ण सृष्टीचा एकच रब आहे. हाच (ईश्वर) अल्लाह सृष्टीच्या आणि सृष्टीतील सर्व कणां- कणांचा निर्माता व नियंता आहे.
गरज आहे फक्त निश्चय करून रोजे (उपवास) करण्याची, सुरुवातीला त्रास हा जाणवतच असतो, परंतु यदाकदाचित त्रास जास्तच झाल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटुन पुन्हा नव्या उमेदीने रोजे (उपवास ) सुरु ठेवले तर आपले उद्दिष्टे साध्य होणारच आहे .
समजा रमजान मुबारक महीन्यातील सर्व रोजे पुर्ण झालेली असेल , जर पुन्हा नकळत आपले व्यसनांची आठवणी जाग्या झाल्या असतील तरी पुन्हा वर्ष भर तुम्हाला आठवड्यातून दोन - तीन वेळा नफील रोजे ठेऊ शकतात. तसे पाहीले तर काही बांधव - श्रद्धावान हे दोन्ही ईद चे दिवस सोडून बारा महिने विविध कारणांनी रोजे ठेवत असतात . असे नफिल रोजे ठेवण्याची पद्धत आहे . प्रेषीत मुहम्मद स्व.सल्लम .हे स्वतः सोमवारचा रोजा व प्रत्येक ईस्लामी महीन्याच्या १४-१५-१६ तारखेलाही रोजा ठेवत असत. इस्लामी पहीला मुहर्रम च्या ९ वा व १० वा दिवस किंवा १० व्या व ११ व्या दिवशी ज्याला यौमें आशुराहा चे रोजे आहेत ,ते ठेवले तर संपूर्ण वर्षभर रोजे ठेवल्याचे पुण्यं (सबाब) प्राप्त होईल .हजरत मुहम्मद स्व.सल्लम. नी म्हटले आहे.काही बांधवांकडून एक दिवसाआड ही रोजा ठेवला जातो. काही ईमानवंत अल्लाहा शी स्वतः च्या काही नवस -गरजा - ईच्छा पुर्ण करण्यासाठी अल्लाह जवळ "नवस" ईच्छा व्यक्त करतात , आमचं नवस पुर्ण झाले तर आम्ही दोन - चार - दहा रोजे ठेवून सत्कार्य करू व त्याबरोबरच एवढी एच्छीक नमाज अदा करु, आशा प्रकारे ईस्लाम मधे अल्लाह शी आपल्या इच्छेप्रमाणे मागणी करण्याची पध्दत आहे.
हा विषय अल्लाहा व त्या ईमानवान,श्रद्धावान मधील परस्पर असतो.
तसेच आपल्या कडुन काही कळत - नकळतपणे काही चुका झाल्या असतील, त्या चुका फक्त तुम्हालाच व्यक्तिगत माहिती आहे , त्या चुकांच्या प्रायश्चित्त म्हणून किंवा स्वतः आत्मक्लेश म्हणून ही रोजा ठेवण्याची व त्याबरोबरच सदका (दान) म्हणून गोरगरिबांना, गरजवंताना जेवण देण्याची किंवा आर्थिक परिस्थिती नुसार काही रक्कम दान देण्याची पद्धत आहे, त्याप्रमाणे दिले जातात.
सध्या अल्लाह ने संधी उपलब्ध करून दिली आहे; तर मग निश्चय करा.. सबाब तर अल्लाह देणारे आहेतच......".
(मित्रांनो लेख आवडला तर नक्की आपल्या मित्रांना जरूर पाठवा, कृपया खाडाखोड करू नयेत, आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.)
@#@#@#@#@#@

