श्रीरामपूर प्रतिनिधी:
मूळचे श्रीरामपूर येथील असणारे व संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव येथे संगणक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले अनिलकुमार विश्वनाथ ब्राह्मणे यांना नुकतीच दक्षिण भारताची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या के. एल. युनिव्हर्सिटी विजयवाडा, आंध्रप्रदेशमधून इंजिनिअरिंग क्षेत्रातील संगणक विषयामध्ये पी.एचडी. पदवी प्राप्त झालेली आहे.
सदर युनिव्हर्सिटी ही आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी संपूर्ण भारतभर ओळखली जाते. या युनिव्हर्सिटीमधून मिळविलेली डॉक्टरेट पदवी अधिक मोलाची समजली जाते.
या युनिव्हर्सिटी मधून डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल ब्राह्मणे यांच्या वरती सर्व स्थरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

