shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथील गणेश थोरपे यांची इंदापूर तालुका भाजपा अनुसूचित जाती मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती.

बावडा येथील गणेश  थोरपे यांची इंदापूर तालुका भाजपा अनुसूचित जाती मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती.

राजवर्धन पाटील यांच्या हस्ते दिले नियुक्तीचे पत्र.
 
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी बावडा गावचे युवक नेतृत्व गणेश प्रकाश थोरपे यांची नियुक्ती भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांच्या वतीने पत्र देऊन करण्यात आली.
निवडीचे पत्र भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे इंदापूर तालुकाप्रमुख राजवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे महिंद्र रेडके युवा उद्योजक अमोलराजे इंगळे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कांबळे, युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष चिंतामणी गायकवाड,  मुजबिन आतार, रोहित चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

  सदर नियुक्ती पत्र मध्ये म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी प्रती असणारी आपली निष्ठा व प्रामाणिकपणा पाहून आपली या पदासाठी निवड करण्यात आलेली असून यापुढे आपण पक्ष वाढीसाठी सक्रिय राहणे. पक्षाच्या कामात नेहमी आपला मोठा सहभाग नोंदवावा. पक्षाच्या लहान मोठ्या बैठका, मे, परिसंवाद, जाहीर सभा यासाठी आपली उपस्थिती आवश्यक राहील. पक्षाने आपल्यावर दिलेला जबाबदारीची जाणीव ठेवून आपण पक्षाच्या वाढीसाठी अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने काम करावे. पक्षाची काम करण्याची कार्यपद्धती, पारदर्शकपणा अवलंबावी. पक्षाचे काम करताना आपले भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धन पाटील माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वांना बरोबर घेऊन सर्वांचा विश्वास संपादन करून काम करावे .पक्षाच्या नावाला दोष लागेल असे कुठलेही काम आपल्या हातून घडू नये याबाबत काळजी घ्यावी. सदैव पक्षाच्या यशासाठी विजयासाठी आपण आपले योगदान देऊन अत्यंत हिरेरीने पक्ष कार्य करावे.
close