प्रतिनिधी : महेश चव्हाण
नगर : १८ / एमआयडीसी परीसरात मोटार सायकल चोऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेवुन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स .पो.नि. राजेंद्र सानप यांचे आदेशाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ सांगळे पोका सुरेश सानप व पोका नवनाथ दहीफळे हे दि.१७ मार्च रोजी पेट्रोलींग करत असताना नगर मनमाड रोडवर सनफार्मा चौक येथून एक संशयीत इसम मोपेड स्कुटीवर येताना दिसला . त्याला थांबवुन नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रवी रामदास नेटके वय ३५ वर्ष गोटुंबे आखाडा ता. राहुरी जि. अहमदनगर असे सांगीतले .
त्यास त्याचे जवळील होन्डा अॅक्टीवा गाडीबद्दल विचारले असता त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागल्याने त्यास मोटार सायकलसह ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु .रजि. नं. २०९/२०२३ मुंबई पोलीस का. क. १२४ प्रमाणे दाखल करुन त्याचा तपास करीत असताना सदर इसमाजवळ असलेली मोपेड होन्डा कंपनीची अॅक्टीवा ही मोटारसायकल चोरीची असुन सदर गाडी ही त्याने पुणे भोसरी एमआयडीसी परीसरातुन चोरुन आणली होती त्याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु. रजि. नं. ९६ / २०२३ भादवी क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे अशी माहीती मिळाली. तसेच सदर आरोपीस अधिक विश्वासात घेतले असता त्याच्या ताब्यात सातारा परीसर पोलीस स्टेशन संभाजीनगर येथील गु. रजि. नं.८५ / २०२३ भादवी क. ३७९ प्रमाणे गुन्हयातील होंण्डा कंपनीची काळया रंगाची शाईन मोटार सायकल मिळुन आली . तसेच बजाज कंपनीची फोर एस चॅम्पीयन व यामाहा कंपनीची एफझेड एस असे वर्णनाची मोटारसायकल मिळुन आल्या . सदर मोटारसायकल त्याने कोठुन चोरुन आणल्या या बाबतचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहेत .
सदरची कारवाई हि मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. डॉ. बी.जी.शेखर पाटील साहेब व मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अजीत पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी स .पो .नी राजेंद्र सानप, पोहेकॉ नंदकुमार सांगळे, पोकों सुरेश सानप, पोकॉ नवनाथ दहीफळे, पोकॉ सुरज देशमुख यांनी केलेली आहे.

