शिवसेनेच्यावतीने श्रीरामपूरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपुर शिवसेना शहराच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त येथील रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्रीरामपुर शिवसेना शहरप्रमुख सुधीर वायखिंडे ( अप्पा), शहर संघटक राजेंद्र भोसले,उपशहरप्रमुख विष्णू मोढे, कार्यध्यक्ष दत्ता करडे,आकील पठाण, वाहतुक सेना उपजिल्हाप्रमुख माधव टिपरे, वाहतुक सेना शहरप्रमुख अविनाश शिरसाठ, दिपक भालेराव आदि मान्यवर उपस्थित होते.
वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

