shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रमजान ईद निमित्त सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत केले इंदापूररात दूधाचे वाटप .

रमजान ईद निमित्त सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत केले इंदापूररात दूधाचे वाटप .
इंदापूर प्रतिनिधी: रमजान ईद निमित्त सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत 
सामाजिक सौहार्दाचे सुवर्णपर्व असलेल्या रमजान ईदच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने इंदापूर शहरात दूध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. निमगाव केतकी व इंदापूर शहरातील कसबा पठाण गल्ली, सरस्वती नगर, जावईवाडी अकलूज नाका, दर्गा मस्जिद चौक या ठिकाणी एकूण ७५०० लिटर दूधाचे वाटप करण्यात आले. 
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अनिकेत वाघ, नगरसेवक पोपट शिंदे, नगरसेवक स्वप्निल राऊत, समीर पठाण, आण्णा वाघमोडे, साधू नरुटे, प्रवीण निगडे, असलम काझी, जावेद सय्यद, शाहरुख बेपारी, निहाल पठाण, अज्जू सय्यद, इम्तियाज बेपारी,  सय्यद, अमीर पठाण, अमीर बागवान व इतर सहकारी उपस्थित होते.


close