shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कल्पतरू संस्थे तर्फे आयोजित महिला उद्योग प्रदर्शन आणि विक्री प्रदर्शनास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

रमेश जेठे (सर)
अहमदनगर - अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आयोजित केलेल्या महिला उद्योग प्रदर्शन आणि विक्री  प्रदर्शनास महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सदर प्रदर्शन दि.२१ व २२ एप्रिल २०२३ रोजी होणार असून पन्नास पेक्षा जास्त महिला संचलित उद्योगांनी सहभाग घेतला आहे.सदर प्रदर्शन महिला सबलीकरणासाठी कल्पतरू संस्थेचे अध्यक्ष तथा तुळजा भवानी बुऱ्हाणनगर देवीचे प्रमुख तथा वंशपरंपरागत पुजारी ॲड. अभिषेक विजय भगत यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सचिव कविता अभिषेक भगत यांनी पुढाकार घेऊन आयोजन केले आहे. 

आज सकाळी नगर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ. दीप्ती सुवेंद्र गांधी व सौ.दुर्गा विजय भगत यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले. यावेळी डॉ.कविता शेळके, डॉ.कल्याणी गाडे,अंजली भगत,मनीषा भगत,सुनंदा भगत,पद्मा बोनुटे ,आरती जामगावकर,संगीत देशमुख,रूपा लोखंडे,शुभांगी शेळके आदी महिला आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बुऱ्हानगर, नागरदेवळे आणि अहमदनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट देत आहेत.
सदर प्रदर्शन अंबिका सांस्कृतिक भवन,बुऱ्हाणनगर देवी मंदिरा समोर चालू असून सर्वानी मोठ्या संख्येने भेट द्यावी आणि महिला सबलीकरणासाठी हातभार लावावा असे आव्हान कल्पतरू संस्थेच्या वतीने सचिव  सौ. कविता अभिषेक भगत यांनी केले आहे.

*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर
close