श्रीरामपूर (प्रतिनिधी)- नव्याने स्थापन झालेल्रा श्रीरामपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अशोक गाडेकर (दै. सार्वमत), कार्याध्यक्षपदी विष्णू वाघ (दै. पुढारी), सचिवपदी प्रकाश कुलथे (दै.स्नेहप्रकाश) व खजिनदारपदी अनिल पांडे (दै. केसरी) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
विष्णूजी वाघ
प्रकाशजी कुलथे
श्रीरामपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारणीची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी करण नवले (दै. राष्ट्र सह्याद्री), विकास अंत्रे (दै. पुण्यनगरी), सहसचिवपदी महेश माळवे (दै. सकाळ), कार्यकारणी सदस्यपदी राजेंद्र बोरसे (दै.सार्वमत), शिवाजी पवार (दै. लोकमत), नवनाथ कुताळ (दै. दिव्य मराठी) व रवी भागवत (दै.आपलं महानगर) आदींची निवडी करण्यात आली आहेत. तसेच शहरातील इतर पत्रकारांनाही सदस्यत्व देण्यात आले आहे. या बैठकीत नव्याने स्थापन झालेल्रा पत्रकार संघाच्या धैय्य धोरणावर चर्चा करण्यात आली.
नूतन संघाची सहायक धर्मादाय आयुक्त नगर यांच्याकडे नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी क्रमांक अहमदनगर /0000074/2023 असा आहे. या संघांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी भविष्यात विविध विधायक उपक्रम राबविले जातील, अशी माहिती नूतन अध्यक्ष अशोक गाडेकर यांनी यावेळी दिली.
वृतसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

