shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गंगाखेड शहरात भगवान श्री परशुरामाचा ऐतिहासिक जन्मोस्तव संत महंतांच्या उपस्थितीत साजरा .

गंगाखेड शहरात भगवान श्री परशुरामाचा ऐतिहासिक जन्मोस्तव संत महंतांच्या उपस्थितीत साजरा

शांततेचे प्रतीक असणारी गंगाखेड शहरातील भव्य मिरवणूक

संपूर्ण ब्रह्मवृंदांच्या एकजुटीचे दर्शन

असंख्य नागरिकांना पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण

कमलेश शेवाळे (देवा) नेवासा
गंगाखेड - गंगाखेड शहरात गेल्या अनेक वर्षापासुन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजीत महापराक्रमी भगवान श्री परशुराम,भगवान विष्णुचे सहावे अवतार सकल ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षी देखील शनिवार दि.२२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पाठक गल्लीतील कुंदेश्वर मंदीरापासुन ७ फुटी भगवान परशुरामाची मुर्ती सजवलेल्या सोनेरी अश्व रथात ठेवुन दुसऱ्या रथात संत महंतांसह स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा ठेवुन विधिवत पद्धतीने धार्मीक मंत्रांच्या जयघोषात महाआरती करून दुपारी ४ वाजता शेकडो ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पालखी पथकासह ढोल ताशे, टाळ मृदंग, व फटाक्यांच्या अतिषबाजीत भव्य मिरवणूकीस सुरवात करण्यात आली. जय परशुराम च्या घोषणांनी संपुर्ण गंगाखेड शहर दुमदुमुन गेले होते. ब्राह्मण समाजाची मिरवणुक म्हणजे शिस्तबद्ध शांततेच प्रतिक म्हणुन संपुर्ण गंगाखेड शहरात संबोधल्या जात होते.

सदरील मिरवणूक भगवती चौकात आल्या नंतर संपुर्ण भगवमय वादळ दिसुन येत होते. यावेळी संपुर्ण पुरूष मंडळींनी जय परशुराम नावाच्या टोप्या तर महिलांनी केशरी साड्या व फेटे घातल्यामुळे शहरातील वातावरण अगदी भगवमय दिसुन येत होते. भगवती चौकात भगवान परशुरामाची महाआरती करून हिंदु संस्कृतीच्या घोषणा देण्यात आल्या. शहरात जागोजागी विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी मिरवणूकीतील भगवान श्री परशुराम भक्तांना पन्हे, लिंबु शरबत,आईसक्रीम,पाणी, रसना ठेवण्यात येवुन दोन्ही रथावर जागोजागी फुलांची उधळण करण्यात आली. मिरवणूक राजेश्वर फंक्शन हॉल वर पोहचताच भगवान श्री परशुरामाच्या मुर्तीचे पुजन करून संतं महंत व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. व्यासपिठावर यज्ञमहर्षी यज्ञेश्वर महाराज सेलुकर, वे.शा.स रामचंद्र महाराज टाकाळकर, ह. भ. प. चैतन्य महाराज कंधारकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर) राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास कौसडीकर वकिल आघाडीचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र पोतदार, परभणी जिल्हाध्यक्ष शंकरराव आजेगावकर, महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती पद्मजाताई कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्लीचे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. शरदराव हेबाळकर यांचे भारतीय संस्कृतीचे रक्षक भगवान श्री परशुराम या विषयावर अंगावर शहारे येणारे व्याख्यान संपन्न झाले. नंतर इतर समाजातील असंख्य व्यक्तींना ब्राह्मण मित्र पुरस्कार देवुन ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या महिला, पुरुष विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देवुन व्यासपिठावरील संत महंतांच्या हस्ते गौरविण्यात आले. 
यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर) यांनी मागील अनेक वर्षापासुन समजासाठीच राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा अवाहलच स्पष्टपणे परखड भाषेत मांडुन आगामी काळात समाजोपयोगी कोणकोणत्या योजना राबवयाच्या आहेत याचे स्पष्टीकरण करून सर्वांचे मतभेद बाजुला ठेवले तरच समाजाचे विस्तारीकरण होवु शकते त्यासाठी सर्वांनी दुरदृष्टी ठेवुनच काम केले पाहिजे असे विस्तृत मनोगत संजय सुपेकर यांनी व्यक्त केले.यावेळी व्यासपिठावरून यज्ञमहर्षी यज्ञेश्वर महाराजांनी सर्व ब्रह्मवृंदांना अशिर्वचन देवुन सर्वांनी एकजुटीनेच रहावे असा संदेश दिला, यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने सर्वांसाठीच सुरू केलेल्या ब्रह्मकेसरी मासिकाचे प्रकाशन करून गंगाखेड शहरातील पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यक्रमाच्या अहवाल प्रॉस्पेक्टचेही प्रकाशन यावेळी व्यासपिठावरील संत महंतांच्या हस्ते करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सेवानिवृत्त रंगराव सुपेकर, नागेश बोरीकर, ॲड.स्मिता देशमुख यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीधराचार्य जोशी महिला अध्यक्षा ॲड. स्मिताताई देशमुख, तालुकाध्यक्ष रत्नाकरराव जोशी शहराध्यक्ष ॲड.राजेश कांदलगावकर, कार्यध्यक्ष डॉ. मोहन कुलकर्णी महासचिव अजय सुपेकर, उपाध्यक्ष रामप्रसाद ओझा, सहसचिव देवानंद जोशी, नियोजन प्रमुख राम कासांडे, मार्गदर्शक आशोकराव पाठक, धोंडोपंत राजेंद्र, नागेश केरकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. श्रद्धाताई बोरफळे, शहराध्यक्षा सौ. अर्चनाताई जोशी, सचिव सौ.रुपालीताई मोहरील,महिला संघटन प्रमुख सौ. प्रभाताई राजेंद्र, श्रीमती देवकीताई कुलकर्णी,सौ. चित्राताई मोहनाळकर, सौ. उत्तराताई चौधरी यांच्यासह अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महिला व पुरूष पदाधिकाऱ्यांनी अथक परीश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता कु. यशश्री पाठक हिच्या अमृतवाणीतुन पसायदानाने करण्यात आली.

*फोटो चे कॅप्शन* 
गंगाखेड शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजीत भगवान श्री परशुराम जन्मोत्सव ऐतिहासिक स्वरूपात संत महंतांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या प्रसंगी यज्ञमहर्षीः यज्ञेश्वर महाराज सेलुकर, चैतन्य महाराज कंधारकर, वे.शा.स. रामचंद्र महाराज टाकळकर,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर), राष्ट्रीय उपाध्यक्षः विलासराव कौसडीकर, व्याख्याते डॉ. शरदराव हेबाळकर, जिल्हाध्यक्ष शंकरराव आजेगावकर, महिला जिल्हाध्यक्षा पद्मजाताई महातपुरीकर,पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, महाराष्ट्र वकिल आघाडी अध्यक्षः ॲड. राजेंद्र पोतदार यांच्यासह विविध मान्यवर येथील राजेश्वर फंक्शन हॉल मध्ये उपस्थित होते.

वृतसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर
close