शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
राहाता तालुक्यातील येथील अग्रेसर असलेली शिर्डी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिर्डी या पतसंस्थेच्या संचालक पदी श्री. नारायण जग्गनाथ लुटे, श्री. मिलिंद मुकूंदराव कोते. पा. यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडी करिता प्राधिकृत अध्याशी अधिकारी श्री. एस.एस.कोठुळे सो, मुख्यलिपीक अधीन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, राहाता यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली त्या सभेत निवड प्रकिया होवुन संचालक पदी नेमणुक झाली.
निवडी नंतर श्री. सुधाकर बाजीराव शिंदे पा संचालक शिर्डी नागरी सहकारी पतसंस्था व श्री. भानुदास बयाजी गोंदकर पा. व्हा.चेअरमन सो, शिर्डी नागरी सहकारी पतसंस्था शिर्डी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच अध्याशी अधिकारी श्री. कोठुळे सोयांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी श्री.कोंडाजी सुर्यभान गायके.पा.संचालक शिर्डी नागरी पतसंस्था शिर्डी, श्री. बाबुराव सखाराम गोंदकर पा.संचालक शिर्डी नागरी पतसंस्था श्री. पुरूषोत्तम परशराम शेळके.पा. संचालक शिर्डी नागरी पतसंस्था, श्री. रमेश कुऱ्हाडे श्री. रावसाहेब आरणे, सौ. निर्मला बाळासाहेब गोंदकर पा. संचालिका शिर्डी नागरी पत, सौ.वंदना दत्तात्रय गोंदकर पा. संचालिका शिर्डी नागरी सहकारी पत श्री. दत्तात्रय तुकाराम गोंदकर पा श्री.बाळासाहेब वेणुनाथ गोंदकर पा,तसेच कार्यकारी अधिकारी श्री.विकास तुरकणे पा. व इतर सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सदर संस्थेस मा. सहाय्यक निंबधक श्री. रावसाहेब खेडकर साहेब व श्री. आर. बी. सदाफळ सो पाटील सो. यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

