shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

वडापुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती  मोठ्या उत्साहात साजरी.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती वडापुरी यांनी केले आयोजन. 
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी (ता. इंदापूर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवात प्रथम ग्रामपंचायत वडापुरी कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व नारळ वाढवून फटाक्यांच्या अताष बाजी मध्ये अभिवादन करण्यात आले. यानंतर वडापुरी येथील छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नारळ वाढवून तसेच शिव मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी पंधारवाडी येथील मुले मुली यांनी 
शिवकालीन गारदिने मानवंदना दिली.तसेच निलेश जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भीमसेना तरुण व्यायाम मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडूळे यांनी उपस्थिती दर्शवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी संध्याकाळी मिरवणुकी पूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थिती दर्शवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की,  अक्षय तृतीयाचा आज अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त व मुस्लिम समाजाच्या दृष्टीने रमजान ईद हा सन महत्त्वाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण आज साजरा करतो आहे. मी सर्व युवकांना सर्व तरुण मंडळींना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आज साडेतीन मुहूर्तापैकी आजचा हा मुहूर्त आहे. या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण सर्वांच्या साक्षीने साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होऊन गेले. जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले. या देशात अनेक राजे महाराजे झाले. पण आज जगात कोणत्याही कानाकोपऱ्यात शहरात गेला तर एकच राजाचं नाव घेतलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. एवढं कर्तृत्व शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून झाली आज यांचा आदर्श घेऊन आपण त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. तसेच पोलीस प्रशासनास बोलताना म्हटले की, शिवजयंती उत्साहात पार पाडण्यामध्ये नेहमीच पोलिसांचा सहकार्य असतं. असं सहकार्य आपण करावे.
शिवाजी चौक येथे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शिवजयंती उत्सवात भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या व यावेळी कै. आदित्य  राजमाने व निसार  इकबाल शेख यांना श्रद्धांजली उपस्थित सर्वांबरोबर वाहण्यात आली व पुढे शिवजयंती उत्सव मिरवणूक ढोल ताशांच्या वाद्यांमध्ये गाव प्रदक्षिणासाठी निघाली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील घोडेस्वार घोड्यासह मिरवणुकीत लोकांचे आकर्षण ठरत होते . शिवजयंती उत्सवात गावातील लहान थोर मोठ्या आनंदाने सहभागी होते.
या कार्यक्रमास गावातील अनेक मान्यवर , युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close