रोजच्या धकाधकीच्या, शहरी जीवनातून विसावा मिळावा, निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्गाकडून किती काय काय शिकण्यासारखे आहे याची प्रचिती यावी या उद्देशाने एसएनडीटी पी व्ही डी टी बीएड शिक्षणशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींची शैक्षणिक सहल माहिम येथे डम्पिंग ग्राउंडवर निर्माण केलेल्या महाराष्ट्र नेचर पार्क धारावी मध्ये गेली होती. येथे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास आणि आनंद या दोन्ही बाबींचा अनुभव विद्यार्थिनींनी घेतला आणि यातून विविध वनस्पती, असंख्य फुलपाखरांचे प्रकार पक्ष्यांच्या जाती, फुले, फळे यांचा आनंद घेतला व अभ्यास विद्यार्थिनींनी केला.
मोकळ्या वातावरणात विद्यार्थिनी प्रफुल्लित झाल्या होत्या. रंगीत फुले, हिरवळ जणू काही वेगळ्याच विश्वात भ्रमंती करतोय असे भासत असल्याच्या भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.
वृक्षसंवर्धनाची ,पर्यावरणाची जोपसना हि संस्कारमूल्ये भावी शिक्षकांमध्ये रुजून ती त्यांनी पुढील पिढीत रुजवावी हा या शैक्षणिक भेट चा मुख्य हेतू होता. या भावी शिक्षकांच्या हातात पुढील पिढी असणार आहॆ. पर्यावरणक्षम भारत या भावी शिक्षकांनी घडवावl असे धोरण या बीएड विभागाचे कायमच असते .
या शैक्षणिक भेटीचे आयोजन महाविद्यालयाच्या एन.एस. एस विभागातर्फे आयोजित करण्यात आले होते. एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रतिभा उरसळ, डॉ. अमोल उबाळे यांनी या शैक्षणिक भेटीचे आयोजन केले होते. सदर भेटी दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाघमारे सर उपस्थित होते. तसेच महविद्यालयातील इतर प्राध्यापक वृंद डॉ. शेडमाके,डॉ. देवरे, डॉ प्रवीण काळे, डॉ.कोलतमे, डॉ. रामराजे व डॉ. राठोड यांनी उपस्थिती दर्शविली.
कु.श्रृती संजय रसाळ - मुंबई
वृत्तसंकलन: शौकतभाई शेख, श्रीरामपूर

