क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त धावडा ता. भोकरदन येथील व्याख्यानामध्ये स्वरालीताई उखर्डे यांनी देशाला समृद्ध करायचे असेल तर महापुरुषांच्या विचारांनीच मार्गक्रमण करावे लागेल,या आशयाने आपले विचार मांडले मांडले.
शिवरायांनी स्वराज्य घडविले,शाहू महाराजांनी मोफत शिक्षण सक्तीचे करून आरक्षण दिले,महात्मा फुलेंनी स्री शिक्षणाचा विडा उचलून स्त्रियांना शिकवलं,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून इथल्या भारतीय समाजाला आपले हक्क आणि अधिकार मिळवून दिले.इथल्या समाजातील अनिष्ट रूढी-प्रथा-परंपरा,जातीव्यवस्था,अंधश्रद्धा,कर्मकांड महापुरुषांनी मोडीत काढले, आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही,असे सांगून इथे शोषणमुक्त समाज निर्माण केला.यावेळी आयोजन समितीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले प्रतिमेचे घरोघरी वाटप केले.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच गंगुबाई बोराडे होत्या.तसेच व्यासपीठावर उपसरपंच इकबाल शेठ, ग्रामपंचायतचे सर्व आजी-माजी सदस्य, परिसरातील विविध गावचे सरपंच,सामाजिक कार्यकर्ते, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले जयंतीउत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक सुरुशे यांनी केले तर, दिनेश देवकर यांनी प्रास्ताविक आणि आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

