वडापुरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी :वडापुरी मध्ये विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त वडापुरी मधील ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले.बुद्ध वंदना व त्रिसरण पंचशीला यावेळी करण्यात आली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध विषयावरती लहान मुलांनी आपली अतिशय चांगल्या पद्धतीचे मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी वडापुरी ग्रामपंचायत चे आजी माजी सरपंच , आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव भीम सेना तरुण व्यायाम मंडळ वडापुरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
सायंकाळी ६ वाजता भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांची मिरवणूक मोठ्या थाटामाटात पार पडली सदरच्या कार्यक्रम सर्व ग्रामस्थांनी व पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं त्याबद्दल भीमसेना तरुण व्यायाम मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

