shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिद्धार्थ नगर (निमसाखर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

सिद्धार्थ नगर (निमसाखर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
 इंदापूर प्रतिनिधी :निमसाखर येथील सिद्धार्थ नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये मध्ये विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त निमसाखर मधील ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात ही बुद्ध वंदना व त्रिसरण पंचशीला  ने करण्यात आली. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस निमसाखर  गावचे सरपंच  धैर्यशील रणवरे पाटील व अन्य मान्यवर  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण सर्वांनी अमलात आणले पाहिजेत असे मत धैर्यशील रणवरे यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले तर निमसाखर  ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी  सुधाकर भिलारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या संदेशाप्रमाणे प्रथम शिक्षण घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले .
कार्यक्रम प्रसंगी निमसाखर ग्रामपंचायत चे आजी माजी सरपंच , आजी माजी ग्रामपंचायत सदस्य,  ग्रामस्थ व समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष भरत उर्फ दया भोसले व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे आभार दया भोसले यांनी मानले तर सूत्रसंचालन पवन भोसले यांनी  तर प्रास्ताविक अतुल भोसले यांनी केले.
close