shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रशांत लबडे यांना उत्तर महाराष्ट्र पुरस्कार जाहीर



नाशिक जिल्हा शिवसेना क्रीडा विभागाचा स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी : प्रविण देशमुख

नेवासा : १७ /   नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे पांडुरंग माध्यमिक विद्यालय वरुर चे कबड्डी प्रशिक्षक प्रशांत लबडे यांना नाशिक जिल्हा शिवसेना क्रीडा विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र पुरस्कार जाहीर झाला आहे .

कबड्डी मध्ये अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवण्यात मोलाचा वाटा असणारे व कबड्डीसाठी शाळेच्या वेळे व्यतिरिक्त वेळ देऊन खेळाडू घडवण्याचे मोठे कार्य ते करत ते आहेत, यामधून  अनेक सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळून ते खेळाडू पोलीस,आर्मी भरती झाले आहेत याच बरोबर प्रो कबड्डी खेळाडू शंकर गदाई, राहुल धनवडे,राहुल खाटीक चे ते बालपणीपासूनचे प्रशिक्षक आहेत. याच कार्याची दखल घेत शिवसेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व क्रीडा विभाग जिल्हाप्रमुख अशोक दुधारी यांनी पुरस्कार निवडीचे पत्र श्री लबडे यांना दिले आहे .

१ मे रोजी हा पुरस्कार नाशिक येथे प्रदान करण्यात येईल. या निवडीबाबत मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील. उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील विश्वस्त पांडुरंग अभंग डॉ. क्षितिज भैया घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा. भारत वाबळे यांनी लबडे यांचे अभिनंदन केले
close