इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील १८ जागेसाठी १५७ अर्ज दाखल.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे याचे चित्र २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता होईल स्पष्ट.
इंदापूर प्रतिनिधी :इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचीसाठी सोमवार (ता.०३) दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १५७ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे.पी.गावडे यांनी दिली.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसी १५७ अर्ज दाखल झाले.यामध्ये इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. यामध्ये सोसायटी मतदारसंघातून ११ सदस्य पैकी (७ सर्वसाधारण जागेसाठी ७०, २ महिला जागेसाठी ११, १ इतर मागास प्रवर्ग जागेसाठी ८ व १ भटक्या जाती जमाती प्रवर्ग जागेसाठी १६), ग्रामपंचायत मतदार संघातून ४ जागांपैकी ( २ सर्वसाधारण जागेसाठी ३२, एक अनुसूचित जाती जमाती जागेसाठी ५, एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जागेसाठी ८ अर्ज) तर २ व्यापारी मतदारसंघ जागेसाठी ५ तर १ हमाल मापाडी मतदार संघ जागेसाठी २ असे एकूण १५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
या उमेदवारी अर्ज भरणाऱ्या मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, मोहोळ चे विधानसभेचे आमदार यशवंत माने, मधुकर भरणे, माजी सभापती विलास माने, अतुल झगडे, अशोक घुगरे, रोहित मोहोळकर, सचिन देवकर, शेखर पानसरे,संग्रामसिंह निंबाळकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख महारुद्र पाटील, माझी सभापती दत्तात्रय फडतरे, रंजीत घोगरे, संजय रुपनवर,तुषार जाधव, रत्नमाला वसंतराव काळे, सचिन काळे अशा अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत.
नामनिर्देशन पत्राची छाननी दि. ५ एप्रिल सकाळी ११:३० पासून होणार आहे. दिनांक ६ एप्रिल ते २०एप्रिल रोजी सकाळी ११ पासून ते ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख आहे. दिनांक २० एप्रिल दुपारी ३वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कशी होईल हे चित्र स्पष्ट दिसेल.
बाजार समितीसाठी ४८२८ जण करणार मतदान
इंदापूर बाजार समितीसाठी एकूण ४ हजार ८२८ मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये सोसायटी मतदारसंघातून ३ हजार ११८, ग्रामपंचायत मतदार संघातून १ हजार १९१, व्यापारी मतदारसंघातून ४६० व हमाल मापाडी मतदारसंघातून ५९ एवढे मतदार पात्र ठरले आहेत.

