shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व ॲक्शन एड इंडिया च्या सहकार्याने आदिवासी मानवाधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व ॲक्शन एड इंडिया च्या सहकार्याने आदिवासी मानवाधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न.
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी 

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने व अँक्शन एड इंडिया च्या सहकार्याने आदिवासी मानवाधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कन्नड जी छत्रपति संभाजीनगर येथे करण्यात आले दोन दिवसीय शिबिरात आदिवासी कामगार(उसतोडणी, नरेगा, मनरेगा,सालगडी, असंघटित क्षेत्रातील सर्वच कामगारांचे प्रश्न, उपाय व कायदे याबाबत अँड महेंद्र चौधरी व प्रा वैभव सोनवणे , आदिवासी महिला आरोग्य, बालविवाह, एकल परित्यक्त्या महिलांचे प्रश्न व जागतिकीकरण व भांडवलशाही मानसिकता व धार्मिक मुलतत्ववादाचे आदिवासीवर होणारे परिणाम यावर किरण ठाकरे सर , अँट्रासिटी अँक्ट जमीन महसुल कायदे, आदिवासी आत्याचाराच्या अनुषंगाने पोलिस कायदे व प्रक्रिया संदर्भात अँड राजन वाघ,वैयक्तिक वनहक्क, सामुहिक वनहक्क, गायरान जमीन गावठाण जमीन राहत्या घराच्या जागा यासंदर्भात प्रक्रिया व कायदे यासंदर्भात दिपक बागुल,आदिवासी विकास विभागाचे बजेट व योजना अनुसची5व6,पेसा अँक्ट महाराष्ट्र आदिवासी बजट अँक्टची गरज याविषयी मा शिवाजीराव ढवळे साहेबांनी ,संघटनेची आदर्श विचारधारा व प्रशिक्षणाच्या अनुषंगाने पुढिल कालातील नियोजन याविषयी तर माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी मिल रे साहेब यांनी जातपडतालणी प्रमाणपत्र काढताना येणार्या आडचणी यावर मार्गदर्शन केले.

यावेळी कर्मचारी संघटनेचे सचिव काशिनाथ सोनवणे सर एकलव्य संघटनेचे उपाध्यक्ष विलास मोरे, रमेश माली दिनकर मोरे यांचे सह 75प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
close