१मे २०२३ पासून पुणे ते मुंबई मंत्रालय धडक मोर्चा (पदयात्रा) आंदोलन करण्यात येणार!"- बाधित शेतकरी आंदोलन
खेड:-"आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गेली ३४ दिवस सुरू असलेले खेड तालुक्यातील पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन-माजी कृषी राज्यमंत्री, श्री.सदाभाऊ खोत यांच्यामध्ये मध्यस्थीने तात्पुरते स्थगित करण्यात आले-शासनाने लवकर दखल घेतली नाही /दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही तर येत्या "महाराष्ट्र दिनी" "१मे २०२३ पासून पुणे ते मुंबई मंत्रालय धडक मोर्चा (पदयात्रा) आंदोलन करण्या
खेड तालुक्यातील २५ते 30 गावातील शेत जमिनीवर भामा आसखेड,चासकमान प्रकल्पां अंतर्गत पुनर्वसन शिक्के गेल्याचाळीस वर्षांपासून टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शिक्के टाकलेली गावे लाभ क्षेत्रात येत नाहीत त्यामुळे पुनर्वसनाचे शिक्के काढून मूळ शेतकऱ्यांचा सातबारा मोकळा करावा. या मागणीसाठी शेतकरी गेली४0 वर्ष संघर्ष करत आहे.
२ मार्च २०२३ पासून खेड तालुक्यातील पुनर्वसनाचे शिक्के टाकलेले गावातील बाधित शेतकरी मुंबई येथील मंत्रालया समोरील "आझाद मैदान" या ठिकाणी बेमुदत उपोषण करत होते.
आज दिनांक ३/४/२०२३ रोजी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला श्री. सदाभाऊ खोत यांनी भेट दिली.
मंत्रालयात महसूल /पुनर्वसनविभागाच्या मुख्य सचिवांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. व त्या संदर्भात लवकरच संयुक्त मीटिंग घेण्याचे आश्वासन घेण्यात आले.
मंत्रालयात सचिवांबरोबर झालेल्या चर्चेनंतर उपोषण स्थळी असणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी आंदोलनासंदर्भात भूमिका मांडली. जर शासनाने बैठक लावली नाही व मार्ग निघाला नाही तर येत्या १ मे "महाराष्ट्र दिन"या दिवसा पासून पुणे ते मुंबई मंत्रालय धडक "पदयात्रा मोर्चा" करण्यात येणार असून या प्रश्न संदर्भात न्याय मिळे पर्यंत मागे हटणार नाही आणि या पदयात्रा आंदोलनात मी स्वतः शेतकऱ्यांबरोबर सहभागी होणार आहे. असे आंदोलन ग्रस्त शेतकऱ्यांनाआश्वासन दिल्यानंतर पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांनी आज रोजी दुपारी ३:०० वाजता सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पाणी घेऊन आंदोलन स्थगित करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला .
याच ठिकाणी १मे" महाराष्ट्र दिनाच्या" आंदोलनासाठी जोरदार तयारी करण्याचे आंदोलनामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी ठरविले.
आंदोलन स्थळी मा.सदाभाऊ खोत यांच्या समवेत मा .श्री. गजाननराव गांडेकर,(राज्य प्रवक्ते, रयत क्रांती शेतकरी संघटना) मा. श्री. सूर्यकांत काळभोर (जिल्हाध्यक्ष क्रांती शेतकरी संघटना)प्रा. डॉ बाळासाहेब माशेरे, मा. सुभाषराव पवळे (खेड,तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना) आप्पासाहेब कड कुणबी अध्यक्ष ,धीरज मुटके माजी नगरसेवक, मा. संतोषशेठ खलाटे, मा. भरत आरगडे, मा. विठ्ठलशेठ,आरगडे, विश्वनाथ पोटवडे, मिनीनाथ साळुंखे, सुरेश कौटकर महिला प्रतिनिधी व पुनर्वसन बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

