शौकतभाई शेख
श्रीरामपूर - मा.खा.जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी श्रीरामपूर तालुका व शहर शाखेच्यावतीने थोर महापुरुषांच्या जयंती निमित्त दिनांक ११ ते १५ एप्रिल दरम्यानं समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, यानिमित्ताने आज दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध सामाजाभिमुख उपक्रमांना उत्साहात सुरुवात झाली, प्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पीआरपीचे तालुका अध्यक्ष संतोष मोकळ यांनी प्रास्ताविक करत सर्वांचे स्वागत केले व आपले विचार मांडले,या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक जयबाबाचे कार्यकारी संपादक मनोजकुमार आगे यांच्या हस्ते कार्यक्रमाची फीत कापण्यात आली,याप्रसंगी बामसेफचे ॲड.रावसाहेब मोहन, समता फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,बौद्ध सेवा संघाचे संस्थापक प्रतापराव देवरे,साप्ता.पूर्वकल्पनाचे संपादक सोमनाथ जानराव, ज्येष्ठ पत्रकार संजय झिंजाड, शाहीर दगडू नरोडे,शेख सर, पुंडलिक मामा दळवी,पी आर पी चे शहराध्यक्ष रमजानभाई शेख आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांची दिनांक ११ एप्रिल रोजी श्रीरामपूर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक श्रीरामपूर येथे नागरिकांना थंड पाण्याचे व फळांची वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास ख्रिस्ती विकास परिषदेचे दीपक कदम,राष्ट्रवादीचे विजयराव खाजेकर,लकी सेठी, गोटू शेठ अग्रवाल,बाळासाहेब मोरे,विजय राठोड, वंचित आघाडीचे चरणदादा त्रिभुवन, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस सुनील लोखंडे, तालुका अध्यक्ष संतोष मोकळ, शहराध्यक्ष रमजान भाई शेख, उपाध्यक्ष संजय त्रिभुवन,जावेद काझी मायकल मुन्तोडे,इमरान शहा,भाऊसाहेब हुसळे, रोहित मोकळ,अजगर शहा,आसिर भाई शेख, राहुल मोकळ, प्रभाकर जराड, भीमराव शिरसाट, अरुण वाघमारे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
दिनांक ११ ते १४ सदरील ठिकाणी दररोज दिवसभर थंड पाणी वाटप केले जाणार असुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त थंडगार सरबत वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे तालुकाध्यक्ष संतोष मोकळ म्हणाले,श्री.मोकळ यांच्या माध्यमातून वर्षाच्या बाराही महिने असे विविध विधायक कार्य पार पडत असतात,त्यांच्या अशा या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे त्यांनी शहर व तालुकाभर आपल्या कुशल कार्य कर्तृत्वाचा एक आगळा - वेगळा ठसा निर्माण केलेला असल्याचे आवर्जून बघावयास मिळते आहे.

