इंदापूर प्रतिनिधी : काटी गावातील कै. दशरथ महादू मोहिते यांचे शनिवारी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात हरिश्चंद्र, पांडुरंग, तुकाराम,चंद्रकांत ही चार मुले व त्यांची नातवंडे मिळून ३० लोकांचे कुटुंब.त्यांचे पुतणे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दिनकर यांच्या प्रेरणेतून व नातू संतोष व सुनील यांच्या पुढाकारातून सर्व कुटुंबीयांनी कै. दशरथ तात्या यांची कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून एक विधायक निर्णय घेतला. अस्थी रक्षा व निर्माल्य विसर्जनामुळे अनेक नद्यांचे पाणी प्रदूषित होत आहे.परंपरेनुसार नदीच्या पाण्यामध्येअस्थीं व रक्षाचे विसर्जन न करता त्या अस्थी एका खड्ड्यामध्ये टाकून त्यावर कुटुंबिय व उपस्थित नातेवाईकांच्या हस्ते झाड लावण्यात आले.तसेच दशक्रियेसाठी ठेवण्यात आलेल्या अस्थी ह्या सुद्धा पाण्यात न सोडता कुटुंबातील सर्व महिलांच्या हस्ते आणखी एक झाड लावण्यात आले. क्रांतीसुर्य महात्मा फुलेंचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणून रमेश शिंदे यांनी सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी केला.मोहिते परिवाराने आपल्या कृतीतून पर्यावरण संवर्धन,स्त्री पुरुष समानता, अंधश्रध्देला मूठमाती दिल्यामुळे परिसरातील लोकांसाठी हा एक वेगळा आदर्श निर्माण झाला असून अनेकांनी या बद्दल कौतुक व्यक्त केले. मोहिते कुटुंबीयांचे एक पाऊल समाजात विधायक बदल होण्यासाठी भविष्यात नक्की उपयोगी पडेल.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

