shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी


श्रीरामपूर प्रतिनिधी:
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त लोयोला दिव्यवाणी चर्च,नॉर्दन ब्रॅच श्रीरामपूर या ठिकाणी  महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेतर्फे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, तथा जिजामाता तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि हिंद सेवा मंडळाचे चेअरमन संजय छल्लारे यांना परिषदेतर्फे त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समाजरत्न पुरस्कार-२०२३ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी लोयोला दिव्यवाणी चर्चेचे धर्मगुरू फा.अनिल चक्रनारायण,पा. अण्णा अमोलिक, उद्योजक रोहन डावखर,अनिल तपासे,परिषदेचे विश्वस्त अविनाश काळे, जिल्हाध्यक्ष दिपक कदम, प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब तोरणे, प्रकाश निकाळे,संघटक अजितकुमार सुडगे,अनिल तापसे विशाल पंडित,राजेंद्र भोसले, प्रकाश भिंगारदिवे, पा.सतीश आल्हाट,पा. राजेश कर्डक,प्रसाद ब्राह्मणे,राजेंद्र भोसले, संजय भोसले, लेविन भोसले, डॉ.संजय दुशिंग, चंद्रकांत त्रिभुवन, सुखदेव पावसे,सुरेश कोळगे,वैभव पंडित, अनिल ब्राह्मणे, सुनील बोरगे, प्रमोद संसारे, जॉन दिवे,संतोष कोळगे, विलास पठारे,विश्वास आमोलिक सुधीर वायखंडे इ.ची उपस्थिती होती.

अभिवादन सभेच्या वेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती  विषद केली.तसेच श्रीरामपूरचे रहिवासी अनिल ब्राम्हणे यांनी पी.एच.डी पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा.भाऊसाहेब तोरणे यांनी सुत्रसंचालन केले तर दिपक कदम यांनी सर्वांचे आभार मानले.

*वृतसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

close