श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील डी पॉल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आज दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी विद्यालयाच्या शिक्षिका मिस एलिझाबेथ यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली तसेच विद्यालयाचे ऍडमिनिस्ट्रेटर अँड फादर थॉमस यांनी आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे प्रेरणादायी तथा दुसऱ्यांसाठी समर्पित होते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापक रेवेरन सिस्टर सेलिन वरील फादर थॉमस यांनी बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सदर कार्यक्रमास सर्वश्री सुनील बोरगे , दीपक कदम, सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यांनी सहकार्य केले आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

