shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेमुळेच लोकशाहीचे मजबुतीकरण; माजी आ.मुरकुटे

शौकतभाई शेख
श्रीरामपूर : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच लोकशाहीचे मजबुतीकरण झाले. त्यांच्या समता व बंधुता आणि अस्पृश्यता निवारणाच्या कार्यामुळे सामाजिक क्रांती झाली. वंचितांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळाला. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे नागरिकांना त्यांचे मुलभूत हक्क प्राप्त झाले. प्रत्येकाला लोकशाही प्रकियेत येण्याची संधी मिळाली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे आणि सामाजिक परिवर्तन घडविणारे डॉ.आंबेडकर हे खर्‍या अर्थाने युगप्रवर्तक होते, असे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रेल्वे स्टेशन जवळील पुतळ्यास माजी आ.श्री.मुरकुटे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे, पंचायत समिती माजी सभापती सौ.सुनीताताई गायकवाड, अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अ‍ॅड्.सुभाष चौधरी, नाना पाटील, रोहन डावखर, अ‍ॅड्.पृथ्वीराज चव्हाण, नितीन क्षीरसागर, राहुल लिहिणार, कुमार दिवे, प्रविण फरगडे, विराज आंबेकर, अमोल कोलते, सौ.शालिनी कोलते, गणेश भाकरे, संकेत संचेती, रमेश सोनवणे, राजेंद्र कंत्रोड, विशाल धनवटे, नवाब सय्यद, शरीफ मेमन, संदीप डावखर, गणेश लोळगे, हेमंत दहिवाळ, सतिष दळे, ज्ञानदेव वर्पे, सदाशिव मुळे, मनोज दिवे, जयेश परमार, रोहित मालकर, राम सोनवणे, प्रमोद करंडे, संजय मोरगे, दत्तात्रय सलालकर, नागेश सोनवणे, दादासाहेब मोरगे, अजय जाधव, अनिल गिरमे, प्रदीप आहिरे, सोहम मुळे, पंकज देवकर, सुहास भागवत, कमलेश वाढणकर, ज्ञानेश्वर त्रिभुवन, अन्वर शेख आदींसह लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच अशोक कारखाना कार्यस्थळावरही महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, माजी चेअरमन कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, संचालक हिम्मतराव धुमाळ, माजी संचालक काशिनाथ गोराणे, माजी सभापती सौ.सुनिताताई गायकवाड, डॉ.मंगेश उंडे, कारखान्याचे कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, विलास लबडे आदींसह अशोक महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.

close