shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज आपण जे समाज्यात मानाने फिरतो हे माझ्या बाबासाहेबांची देण - अनिताताई खरात.

आज आपण जे समाज्यात मानाने फिरतो हे माझ्या बाबासाहेबांची देण - अनिताताई खरात.

तेजपृथ्वी ग्रुपकडून  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन .
इंदापूर प्रतिनिधी :आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त शहरातील आंबेडकर नगर , सरस्वती नगर, बौध्द विहार,नगरपालिका या व इतर ठिकाणी तेजपृथ्वी ग्रुपकडून  बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले.
 या वेळी तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्ष अनिताताई खरात  मनाल्या की,  बाबासाहेब नेहमी सांगायचे तुम्ही किती अंतर चालत गेला यापेक्षा कोणत्या दिशेने गेला. तुमच्या चालण्याने गोरगरीब, कष्टकरी शेतकरी विद्यार्थी यांना किती फायदा झाला हे महत्वाचे आहे, बाबासाहेबांनी नेहमीच समता,स्वतंत्रता बंदुता शिकवणारा धर्म निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. आज आपण जे समाज्यात मानाने फिरतो हे माझ्या बाबासाहेबांची देण आहे.
शिका संघटित हो आणि संघर्ष करा या विचारांची त्यांनी समाजाला जाणीव करून दिली. मुर्दाड समाजाला झोपेतून जागे केले,गोरगरीबांना त्यांचे हक्क  मिळवून दिले.ज्यांच्या नावाने देश चालतो  आपणास एखाद्या विषयावर 4 ओळी लिहायला जमत नाही.माझ्या बाबांनी संविधान लिहिलं आणि याच संविधानाच्या जोरावर आज आपण मानाने फिरतो. आपणाला जे अधिकार मिळाले ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर  यांच्यामुळेच मिळाले.आपण या अधिकाराचा उपयोग कायमस्वरूपी चांगल्या कामासाठी करून समाजाची प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि हेच बाबासाहेबांना विनम्र अभिवादन ठरेल असे त्या म्हणाल्या.
 यावेळी तेज पृथ्वी ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे,सद्दाम भाई बागवान व इतर मान्यवर उपस्थित होते.
close