*रमेशजी जेठे समाजातील डोळस पञकार, लढाऊ व्यक्तिमत्व...*
*"शिर्डी एक्सप्रेसच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांसाठी लढा देणारा योद्धा...!!"*
इंदापूर प्रतिनिधी: 'शिर्डी एक्सप्रेसचे' संपादक रमेशजी जेठे सर म्हणजे सातत्याने समाजाच्या प्रश्नांबाबत लढा देणारा लढवय्या व्यक्तिमत्व.
मागील पंधरा वर्षांपासून कुठलीही आर्थिक मदत नसताना स्वतःची आर्थिक बाजू कमकुवत असतानाही अविरतपणे समाजहितास्तव वर्तमानपञाच्या माध्यमातून समाजसेवा करणारे व्यक्तिमत्व.
मागील पंधरा वर्षांपासून न डगमगता, प्रतिकूल परिस्थितीतही माघार न घेता लढणारा पञकार, लेखक, अभिनेता आणि चळवळीतला सच्चा कार्यकर्ता, निर्भिडपणे व्यक्त होणारा, सातत्याने चळवळी टिकल्या पाहिजेत म्हणून धडपडणारा, समाजाचे प्रश्न थेट प्रशासनापर्यंत कसे पोहोचतील यासाठी प्रत्येक मंञी महोदयांच्या वाॅटसला समाजाचे प्रश्न पाठवून समाजाचे प्रश्न सतत चर्चेत ठेवणारा, चळवळीची दिशा ठरवणारा तथा चळवळींचा भाष्यकार आणि आमचे स्नेही मिञ सातत्याने चळवळी आणि सामाजिक प्रश्न यावर चिंतनशीलपणे, स्पष्टवक्तेपणाने बोलणारे...
रमेशजी जेठे सर अहमदनगर येथे वास्तव्यास असून संबंध महाराष्ट्रभर संपर्क असणारा असा हा निर्भीड पञकार आणि चिञपटात अभिनय साकारणारा अवलिया व्यक्तिमत्व...
सर आज आपला जन्मदिवस. आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! आपणास सुखसमृद्धी, दीर्घआयुरारोग्य लाभो याच आपणास सदीच्छा सर....!!!
---------------------------------------------
✍️✍️
*श्रीकांत मुद्दे, लातूर*

