shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नितीन गडकरी यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची पालखी मार्गाच्या कामासंदर्भात चर्चा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेशी हर्षवर्धन पाटील यांची पालखी मार्गाच्या कामासंदर्भात चर्चा
  - मंत्री गडकरी घेणार अधिकारी व कंत्राटदारांची बैठक 
  - रस्त्याच्या कामांची ना.गडकरी करणार पाहणी
  -  कालबद्ध कार्यक्रम आखून रस्त्याचे काम लवकर पूर्ण करणार 
इंदापूर : प्रतिनिधी दि.17/4/23
            केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथे रविवारी (दि.16) भेट घेऊन संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे  काम गुणवत्तापूर्ण दर्जेदार व्हावे व लवकर काम पुर्ण करणेकरिता कालबद्ध कार्यक्रम आखण्याची मागणी केली. 
                संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे कामाची ना.नितीन गडकरी यांनी स्वतंत्रपणे दौरा काढून पाहणी करावी, सर्व शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम मिळणेसाठी वाद वादविवादाचे दावे लवकर निघाली काढण्यात यावेत, अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
         सध्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम संथ गतीने चालू असून, कामाच्या ठिकाणी फलक व इतर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांचे कंत्राटदारांकडून पालन केले जात नसल्याने सतत अपघात घडत आहेत, त्यात अनेकांना जीव गमावावा लागला आहे. पालखी मार्गाच्या अपूर्ण कामांमुळे जनतेची गैरस होत आहे. त्यामुळे रस्त्याची गुणवत्तापूर्ण कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकारी वर्ग, संबंधित कंत्राटदार व त्यांचे सब कंत्राटदार यांची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. या सर्व मागण्या मंत्री नितीन गडकरी यांनी मान्य केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
         दरम्यान, इंदापूर तालुक्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे चालू आहेत. तसेच नवीन विकास कामांना राज्य व केंद्र सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या विविध विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजनांचे निमंत्रणही या भेटीत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी ना. नितीन गडकरी यांना दिले. 


close