shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी साजरी..!



सामोडे -(श्री दिलीप घरटे प्रतिनिधी):

अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही.जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य झेड.एम.गवळी, उपप्राचार्य जे.पी.सोनवणे, जेष्ठ शिक्षक मनेष माळी अधिक्षक एन.बी.वाघ होते.प्रथमत: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.प्रा.विजय ठाकरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जीवन परिचय करून दिला. प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी ब्रिटिश राजसत्तेच्या काळात सामान्य जनतेला मिळवून दिलेला न्याय व या काळात बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले प्रयत्न या विषयी माहिती दिली.उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणपत्रक प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ढोले यांनी तर आभारप्रदर्शन संदिप पवार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, चतुर्थ कर्मचारी व विद्यार्थी प्रयत्नशील होते.
close