शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी येथील बस स्थानकाच्या शेजारी सोसायटीच्या स्टॉलसमोर गोकूळ सोन्याबापू गाडेकर, वय- ३८, रा. अस्तगाव ( राहता ) यांची १० हजार रू. किंमतीची होन्डा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एमएच १७ सीए १०६२ ही दि. १६ मे रोजी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास लावलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याप्रकरणी शिर्डी पोलिसात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

