प्रतिनिधी : महेश चव्हाण
नगर : २ / महामानव बाबा आमटे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. आनंत झेंडे सर यांनी आदिवासी मुलांचा कलाविष्कार या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ज्या आदिवासी महिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी खूप मोठा संघर्ष केला, अनेक संकटांना सामोरे गेल्या पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी मागे हटले नाहीत अशा आदर्श मातांचा छाया रामसिंग भोसले , तुळसाबाई बाजीराव काळे, कौसाबाई काळे या चार आदिवासी मातांचा विशेष सन्मान केला .
छाया रामसिंग भोसले या लोणी व्यंकनाथ या गावात राहत असून त्यांचे पती रामसिंग जवड्या भोसले या दोघांनी मिळून त्यांचा मुलगा संतोष भोसले याला बीएससी ऍग्री, पत्रकार, या पदव्या घेण्यापर्यंत खूप मोठा संघर्ष केला रोजंदारी करून मुलाला शिकवले आणि आजही त्यांचा मुलगा संतोष भोसले एलएलबी आणि एम एस डब्ल्यू करत आहे ते आई वडिलांच्या आशीर्वादामुळेच .
आणि म्हणून एका आदिवासी पारधी कुटुंबातील दांपत्याने स्वतःकडे कोणत्याच प्रकारची संपत्ती, प्रॉपर्टी नसताना रोजंदारीने कामाला जाऊन , लोकांचे साल धरून मुलाला शिकवण ही सोपी गोष्ट नाही.
या पती-पत्नीने निसर्गाला सुद्धा तोंड देऊन लेकरांना सुखरूप ठेवले आणि घडवले स्वतःच्या पायावर उभा केले . संतोष सात-आठ वर्षाचा असताना भरपूर पाऊस झाला त्या पावसात झोपडी पाण्यात तरंगत होती परंतु दोन मेडीमुळे झोपडी जाग्यावर होती पण कोपीत सर्वत्र पाणी होते त्या पाण्यात तीन दगडाची चूल होती त्या तीन दगडावर आई संतोषला घेऊन रात्रभर बसली होती.
संतोष दादासाहेब मोकाशी कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर राजमाची तालुका कराड जिल्हा सातारा येथे पदवीचे शिक्षण घेत असताना त्याला फी भरायला गळ्यातले मंगळसूत्र मोडले अशा कित्येक व्यथा त्यांनी अनुभवले आहेत.
एका आदिवासी पारधी समाजातील जोडप्याने पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलाला शिकवण ही सोपी गोष्ट नाही आणि म्हणून या सर्व त्यागाचा संघर्षाचा आणि त्यांनी केलेल्या कष्टाचा अनंत झेंडे सर यांना अभिमान वाटला आणि आशा आदर्श मातेच्या दांपत्याच्या पाठीवर शाब्बासकीचे थाप दिल्यावर नक्कीच इथून पुढे आदिवासी पारधी समाजातील अनेक मुलं पदवीधर होतील या हेतूने छाया भोसले आणि रामसिंग भोसले या संतोषच्या आई-वडिलांचा श्रीगोंदा चे आरोग्य अधिकारी नितीन खामकर सर श्रीगोंदा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे साहेब , ॲड.श्याम असावा, मा.मनोज कळमकर, डॉ.प्रकाश सेठ यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला हा सन्मान घेण्यासाठी छाया रामसिंग भोसले या माते सोबत यशवंतराव चव्हाण सामाजिक युवा पुरस्कार 2021 ची मानकरी त्यांची सून छाया भोसले तर मुलगा संतोष भोसले उपस्थित होते. अशी माहिती संतोष भोसले यांनी दिली.

