shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोनिका हनुमंत डोके हिची दहावीच्या परीक्षेत गरुड झेप



प्रतिनिधी : राम चव्हाण 

श्रीगोंदा : ८  / श्रीगोंदा तालुक्यातील  तरडगव्हाण येथील हनुमान अर्जुन डोके यांची कन्या मोनिकाला श्री छत्रपती शिवाजी विद्यालय घोगरगाव तालुका श्रीगोंदा येथे दहावीच्या परीक्षेमध्ये भरभरून यश मिळाले आहे त्यामध्ये तिचा केंद्रामध्ये तिसरा क्रमांक आला आहे 94. 40 टक्के गुण छत्रपती शिवाजी विद्यालय घोगरगाव  या विद्यालय गुण प्राप्त झाले आहेत खऱ्या अर्थाने ह्या मुलीचे तरडगव्हाण येथील ग्रामस्थांसह श्रीगोंदा तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

 हनुमान अर्जुन डोके तरडगव्हाण येथील प्रगतशील शेतकरी आहेत व त्यांचा हॉटेल व्यवसाय अहमदनगर शहरात आहे हे सर्व करीत असताना मुलांकडे शिक्षणाकडे लक्ष ठेवणे अवघड असताना सुद्धा मुलीने स्वतःच्या पद्धतीने अभ्यास करून गुण मिळवल्याबद्दल हनुमान डोके यांना सुद्धा फार आनंद झाला आहे .

विद्यार्थिनी मोनिका हिने गुण प्राप्त केल्याबद्दल तिच्याशी संवाद साधला असता त्याबद्दल यश प्राप्तीचे खरे कारण काय असे विचारले त्यावेळेस तिने सांगितले की विद्यालयातील सर्व शिक्षकांचे वडिलांचे योग्य ते मार्गदर्शन मिळाल्याने हे यश प्राप्त झाले .
close