शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमी
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महाराजांचे पूजन सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिर्डीत करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर, निलेश कोते, भारतीय वि. परिषदेचे चेतन कोते, विलास कोते, उत्तम कोते, अजय नागरे, राजेंद्र बनकर, महेश लोढा, अशोक गायके, सोमनाथ कोते, रमेश वाकचौरे, अजय नागरे, संदिप काटकर, मयुर दांगट आदी मान्यवरांसह आयोजक मनसेचे दत्तात्रय कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागृती मंडळातील राहुल देशमुख, कुणाल सांबारे, किरण वर्मा, ज्ञानेश्वर जगदाळे, प्रसाद देशमुख, किरण गुलदगड, शुभम देशमुख भिमा गाजरे, कैलास भुजबळ, सुरेश सोनवणे, रुपेश देवकर, बाबा सुरंजे, दिपक शेलार आदींनी परिश्रम घेतले.

