श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.
कालठण न.१ येथील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: दि.८ जून २०२३ रोजी कालठण न.१ ( ता. इंदापूर) येथे श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन तंटामुक्ती अध्यक्ष दादासाहेब गलांडे, युवा नेते हनुमंत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे जाती जमातीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे, युवक नेते संदीप जाधव, माजी उपसरपंच अण्णासाहेब कोळेकर ,महादेव भोई ,बाळासाहेब कोळेकर , कॅप्टन राहुल भोई व संयोजक,विद्यमान उपसरपंच मधुकर दीक्षित,माजी उपसरपंच संतोष जगताप,लक्ष्मण कांबळे
व इतर मान्यवर व श्री.काळभैरवनाथ क्रिकेट क्लबचे संयोजक खेळाडू उपस्थितीत संपन्न झाला.
भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषक कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव यांच्या वतीने ११,१११/-, द्वितीय पारितोषक राष्ट्रवादी काँग्रेसचे भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे व युवा नेतृत्व हनुमंत पाटील यांच्या वतीने ७,७७७/-, तृतीय पारितोषक माजी उपसरपंच अण्णासाहेब कोळेकर यांच्यावतीने ५,५५५/-, चतुर्थ पारितोषक प्रगतशील बागातदार दिलावर भाई शेख यांच्यावतीने ३,३३३/-ठेवण्यात आले आहे. तसेच विशेष पारितोषिकही यामध्ये ठेवण्यात आलेले आहे.

