shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदिवासी समाजाचे संरक्षण पोलीस बांधवांनी करावे अशी एकलव्य संघटनेची मागणी

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी 

राहाता येथील पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड सेवा निवृत्त नुकतेच  झालेने पोलीस निरीक्षक पदाचा चार्ज कैलास वाघ यांनी स्विकारला आहे.राहाता शहराला अनेक खेडेपाडे जोडल्याने राहाता पोलीसावर शासकीय कामाचा मोठया प्रमाणात कामाचा बोजा हा ठरलेला आहे.नूकतेच पोलीस निरीक्षक वाघ यांनी या पदाचा चार्ज घेतला आसून राहाता शहरासह पोलीस स्टेशन हद्दीत अनलिगल मूव्हमेंट करनारे पुढारी,संघटना सामाजिक कार्यकर्ते,नागरीक यानी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन पोलीस निरीक्षक वाघ यांनी केले आहे. 

अदिवासी नेते सुकदेव गायकवाड व त्याचे कार्यकर्ते यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. व अदीवासी समाजावर होत असलेले दिवसेदीवस अन्याय वाढ होत असल्याने त्यांचे लक्ष वेधून  अतिशय गंभीर बाब असल्याने अदिवासी समाजाचे संरक्षण पोलीस बांधवांनी करावे अशी मागणी करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी एकलव्य संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
close