यापुढे शिवसैनिकांना बळ देणार - मुकुंद सिनगर
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
राजकीय बातमी
नुकताच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकारी यांचा मेळावा व मार्गदर्शन शिबीर शिर्डी येथील हॉटेल शांतीकमल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना (UBT) चे आमदार आदरणीय नरेंद्र भाऊ दराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार आदरणीय भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते.
याचवेळी कार्यक्रमाचे संयोजक, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय मुकुंद सिनगर यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी आ. नरेंद्र दराडे यांनी कक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे कौतुक करत सामाजिक कार्यातून घडणारा खरा कार्यकर्ता राजकारणात यशस्वी होत असून असेच काम सुरु ठेवल्यास सिनगर यांना राजकारणात मोठी संधी असल्याचे गौरवोदगार काढले.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्याचा संयुक्तिक मेळावा घेण्यात आला.
यावेळी सर्वप्रथम श्री साईबाबा आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर अहमदनगर जिल्हा संघटक अशोकराव थोरे व त्यांचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आणि नाशिक जिल्हा संघटक अनिलराव गायखे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या निवडीबद्दल स्वागत करून सर्वांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे, माजी जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा विश्वस्त सचिन कोते, शहरप्रमुख संजय शिंदे, उपतालुकाप्रमुख विठ्ठल पवार, उपशहरप्रमुख अमोल गायके, युवासेना तालुकाप्रमुख किरण जपे, आदींनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्यात.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या कामकाजबाबत मुकुंद सिनगर यांनी अधिक विस्तृत माहिती देताना सांगितले की, भारत सरकारने ग्राहक हितासाठी सन 2019 च्या केलेल्या सुधारित कायद्याप्रमाणे ग्राहक हक्काचे संरक्षण अधिक सक्षम केले असून यापुढे आता कुठल्याही ग्राहकाचे शोषण होणार नाही. आजवर गेल्या 10 वर्षात नगर जिल्ह्यातील 3000 पेक्षा जास्त तक्रारीचे निवारण करून ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचं काम कक्षानं प्रामाणिकपणे केलं आहे व करत आहे. आपल्या जिल्ह्यात रुग्ण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असून आता डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होणार नाही तसेच आपल्या शेतकरी बांधवांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक होणार नाही याची जागरूक पदाधिकारी यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय कक्ष तालुका संघटक व कक्ष शहर संघटक यांना सूचना देण्यात आल्या की, प्रत्येकी किमान 10 शाखेची बांधणी करून शाखा संघटक व शहर संघटक यांच्या माध्यमातून 100 नवीन शाखांचे उदघाटन शिवसेनेचे सचिव व शिवसेना(GSK) चे अध्यक्ष मा.खा. अनिल भाऊ देसाई यांची अधिकृत वेळ घेऊन त्यांच्या शुभहस्ते अनावरण करणार असल्याचे जाहीर केले. आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी यापुढे शिवसैनिकांना बळ देणार असून शेवटी सिनगर यांनी नव तरुणांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने नाशिक जिल्हा संघटक अनिल गायखे, नगर जिल्हा संघटक अशोक थोरे, कक्ष जिल्हा कार्यालय चिटणीस ऍड. राहुल नवले, कक्ष जिल्हा सह संघटक सर्व श्री. प्रमोद कुलट, दत्ता कडू, कक्ष उपजिल्हा संघटक सर्व श्री. मिलिंद नाईकवाडी, अशोक पवार, काळू हाटकर, कक्ष तालुका संघटक सर्व श्री. अमोल शिंदे, श्रीकांत शेळके, जयराम कदम, कृष्णा पोपळघट, रिंकेश जाधव, सदाशिव हासे, लक्ष्मण शेळके, कक्ष तालुका सह संघटक सर्व श्री. रोहित पवार, अमित कोलते, आदिनाथ फाटके, राजेंद्र म्हसे, गणेश सातपुते, प्रविण कडलग, संतोष शेटे, देविदास मोरे, कक्ष शहर संघटक सर्व श्री. रविंद्र कथले, जगदीश बिरारी, कैलास जिरे, योगेश घाडगे, रविंद्र सोनवणे, योगेश बिचकर, विक्रम मालुंजकर आदींचा आ.नरेंद्र दराडे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
मेळावा यशस्वीतेसाठी मिनीनाथ शिंदे, दादासाहेब सापिके, गणेश वाळुंज, अनिल कापसे, अमोल आदमने, उत्तमराव जाधव, श्रीराम कदम, सुधाकर दाभाडे, अशोक मगर, सुधाकर तावडे आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन अशोकराव थोरे यांनी तर रवि सोनवणे यांनी आभार मानले.

