पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव विज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन आणि अंतर विद्याशाखीय शाखांमधील 61 अभ्यास मंडळावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात आली, त्यामध्ये
नवसह्याद्री शैक्षणिक संकुलातील एमबीए विभागाचे संचालक डॉ. तानाजी दबडे यांची हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात दीर्घ अनुभव व स्पर्धात्मक युगात हॉटेल मॅनेजमेंट सारख्या अभ्यास मंडळाचा अमुलाग्र बदल करून योग्य अशी दिशा देण्याबद्दलचे मत डॉ. तानाजी दबडे यांनी व्यक्त केले.
या निवडीबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी नवसह्याद्रीचे संस्थापक अध्यक्ष मा. पोपटरावजी सुके, ग्रुप डायरेक्टर श्री. सागर सुके सर नवसह्याद्री फार्मसीचे प्राचार्य डॉ. ओतारी, इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. दळवी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. भोकरे, गुरुकुल प्राचार्य प्रा. किरण पवार तसेच डॉ. लक्ष्मण डोईफोडे, डॉ. सुहास पाखरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर रुंद यांनी तोंड भरून कौतुक केले.

