shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक समितीचे वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न.


शिक्षक समितीचे वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न.

गुणवत्ते बरोबर संस्कारक्षम पीढी घडवण्याचे पालक व शिक्षक यांचेसमोर आव्हान. - मच्छिंद्र चांदणे.
इंदापूर प्रतिनिधी: दि. २५ इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे वतीने निमगाव केतकी येथील सुवर्णयुग गणेश मंदिर सैनिक स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मिळाल्याबद्दल गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार शिक्षक समिती पदाधिकारी व मच्छिंद्र चांदणे , तात्यासाहेब वडापुर , ॲड दिलीप पाटील , अरूण मिरगणे , दिलीप अभंग यांचे हस्ते करण्यात आला.
        यावेळी क्षितीज मंगेश शेंडे सैनिक स्कूल निवड , जवाहर नवोदय विद्यालय शिक्रापूर येथे स्वराली भोंग , हर्षराज किरण म्हेत्रे , अनुराग तेजस भोंग , ऋतूराज अमोल शेंडे , मल्हार श्रीकांत करे यांचा फेटा , शैक्षणिक साहित्य , श्रीफळ , गुलाब पुष्प , शाल देऊन सन्मान करण्यात आला. मच्छिंद्र चांदणे , ॲड दिलीप पाटील , डॉ तेजस भोंग , किरण म्हेत्रे , तात्यासाहेब वडापुरे , दिलीप अभंग यांनी गुणवंत विद्यार्थी शुभेच्छा दिल्या.प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल प्रताप शिरसट , नीट परिक्षेत ६०० गुण मिळवलेला करण हेगडे व प्रज्वल भारत ननवरे याने दहावीत ९२% गुण मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
        यावेळी मनोहर चांदणे ,गणेश घाडगे , कोषाध्यक्ष भारत ननवरे , तात्यासाहेब राऊत , अजिनाथ आदलिंग , भारत शेंडे , राजु भोंग , भुषण जौंजाळ , विकास भोंग , अमोल शेंडे , गणपत खोमणे गुरूजी , राजकुमार तरंगे , भारत ननवरे , सतेश भोंग,रत्नमाला भोंग , रोहिणी भोंग , रोहिणी म्हेत्रे उपस्थित होते. सुत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले.
close