shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंकजाताईंना बीआरएस व एमआयएमकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर..!!



 पंकजाताईंचे राज्यात राजकिय वजन वाढले;

 पंकजाताईंची मुत्सद्दीगिरीच कामाला येणार..

 प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :- भाजपाचे राष्ट्रीय सचिव तथा मराठवाडयातील लोकमान्य नेतृत्व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे सध्या राज्यात व देशात वजन वाढले आहे. कारण येणारा काळ हा लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा आहे. 


त्यामुळे प्रत्येक राजकिय पक्षाला पंकजाताई हव्या आहेत कारण पंकजाताई या मासलिडर असून त्यांचे नेतृत्व जनसामान्यांनी व ओबीसींनी स्वीकारलेले आहे. तसेच पंकजाताईंचे राज्यात भाजपाकडून आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंख छाटण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात गेल्या चार वर्षात पाहवयास मिळाला आहे. पंकजाताई यांनी अनेकवेळा मनातील खंत बोलून दाखविलेली आहे. सध्या लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरु असल्याने पंकजाताई यांनी आमच्या पक्षात यावे अशी प्रत्येक पक्षाची धारणा आहे. म्हणूनच परवा तेलंगणचा सत्ताधारी पक्ष असलेला बीआरएस याने पंकजाताईंना खुलेपणाने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली आहे. तसेच एमआयएम या पक्षाचे प्रमुख खा.असेसोद्दीन औवेसी यांनीसुद्धा एमआयएममध्ये पंकजाताईंनी यावे असे आवाहन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नजरा पंकजाताईंच्या भुमिकेकडे लागल्या आहेत. परंतु आज पंकजाताई निर्णय घेतील असे अजिबात नाही. कारण बाजी पंकजाताईंच्या हातात आहे. जानेवारी 2024 नंतर पंकजाताई व त्यांची भुमिका मात्र स्पष्टपणे दिसून येईल. त्यांची मुत्सद्देगिरी आणि कौशल्य व योग्य निर्णय हा त्याचवेळी महत्वाचा ठरणार आहे.
 

गेल्या 4 वर्षापासून भाजपामध्ये अनेकांचा उत्कर्ष करण्यात आला. ज्याची पत व प्रतिष्ठा नव्हती विशेषतः पंकजाताईसमोर उभा राहण्याची पात्रता नव्हती अशांना राजकीय बळ देवून समाजाचे नेतृत्व म्हणून लादण्यात आले आणि पंकजाताईंचे जाणीवपूर्वक पंख छाटण्याचे प्रयत्न करण्यात आले. दारातील........ सन्मान देवू पण तुम्हाला (पंकजाताई) नाहीच नाही अशीच भुमिका देवेंद्र फडणवीस व भाजपाची राहिली. ज्या ज्या ज्यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुका जाहिर झाल्या त्या  त्या त्यावेळी पंकजाताईंचे नाव माध्यमांनी चालविले कारण अनेकांना भाजपाने संधी दिली त्यामुळे पंकजाताईंना क्रियाशील नेतृत्व म्हणून संधी देतील अशी अपेक्षा माध्यमांची होती. परंतु ही अपेक्षा फोल ठरली. 

गेल्या चार वर्षात जवळपास दोन डझन विधानपरिषदेचे आमदार भरले. परंतु पंकजाताईंना साधे विचारलेसुद्धा नाही. अनेकवेळा व्यथित होवून पंकजाताईंनी माध्यमांना बाईट दिल्या आणि आपली खंत व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भाजपातील कुठलेही नेतृत्व किंवा मंत्री महोदय बोलायला तयार नाहीत एवढा धाक आणि दहशत देवेंद्र फडणवीस यांची आहे.त्यामुळे कोणीही त्यांच्याविरोधात किंवा पंकजाताईंच्या बाजूने बोलत नाहीत. गेल्या चार वर्षात अनेक अपमान पचवत संघर्षाची वाट धरत पंकजाताई महत्वाच्या टप्प्यापर्यंत पोहचल्या आहेत. येत्या सहा महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. पंकजाताईंना मानणारा मतदार हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे त्या ज्या समुदायातून येतात त्या समुदायावर त्यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांची व्होटबँक मजबूत आहे. 

महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. त्यांचा शब्द हाच भाजपाच्या विजयाचा मानबिंदू आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पंकजाताई या सर्वच राजकीय पक्षांना हव्या आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी आणि पक्षाने दिलेली वागणुक व देवेंद्र फडणवीसांनी पावलोपावली केलेला अप्रत्यक्ष अपमान यामुळे अनेक राजकीय पक्षांनी पंकजाताईंनी आपल्या पक्षात येण्याच्या ऑफर दिल्या आहेत. 

तेलंगण राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या बीआरएस पक्षाने त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. तर एमआयएमचे प्रमुख खा.असिदोद्दीन औवेसी यांनीही एमआयएममध्ये येण्याचे आवाहन केले आहे. येणार्‍या काळात आणखी इतर राजकीय पक्ष पंकजाताईंना पक्षात येण्याची विनंती करतील परंतु आज पंकजाताई पक्षाचे काम हे प्रामाणिकपणे करीत आहेत. आजच्या दिवशी कसलाही वेगळा निर्णय घेणार नाही किंवा त्याची चर्चा करणार नाहीत. मात्र जानेवारी 2024 नंतर सर्व तख्त त्यांच्या बाजूने असेल कारण पक्षाला राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्रातून आहे. 

त्यामुळे पंकजाताईंना डावलून किंवा बाजूला सारणे पक्षाला परवडणारे नाही. राज्य भाजपाकडून पंकजाताईंना सन्मानाची अपेक्षा नाही कारण देवेंद्र फडणवीसांनी गेल्या चार वर्षात खूप पचवण्याचे बळ दिलेले आहे. केंद्रीय नेतृत्व व विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडूनच पंकजाताईंना अपेक्षा आहेत. त्यावेळी पंकजाताईंची मुत्सद्देगिरी, कौशल्य आणि राजकीय चुुणुक दिसून येईल पंकजाताई हे राज्याचे दखलपात्र नेतृत्व आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्यांची व्याप्ती व आवाका कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाणीवपूर्वक क्रमांक दोनच्या नेत्यांना व विशेषतः ज्यांनी जास्त पक्ष बदलले अशांना केवळ विरोधकांवर भुंकण्यासाठी आमदारकी बहाल केलेली आहे. पंकजाताईंचे राजकारण हे सुसंस्कृत आणि लोककल्याणाचे असल्याने त्यांचा उपयोग फडणवीसांना काहीही नव्हता म्हणून त्यांना वेटिंगवर ठेवलेले होते.
close