*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी मध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिन' व 'जागतिक संगीत दिन' उत्साहात साजरा.*
इंदापूर प्रतिनिधी: जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मलेशिया या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत निवड झालेले योगा शिक्षक श्री. नितीन बांगर सर यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनात महत्त्वपूर्ण असणारी योगाची माहिती सांगितली,*करा योग, रहा निरोग* या उक्तीप्रमाणे आपण रोज योगा केला तर, आपले आरोग्य निरोगी राहते, योग फक्त शरीरापुरता मर्यादित नसून मनाचे आरोग्य, श्वसन,विविध आजार त्याचप्रमाणे श्वासोच्छवास यावरील नियंत्रणासाठी फायदेशीर आहे. योग चित्त वृत्ती निरोध - योगाने चित्तावर म्हणजेच मनावर नियंत्रण ठेवता येते असे सांगितले, सर्व विद्यार्थ्यांची योगासने करून घेतली त्यामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम, आसने, ध्यान, योगनिद्रा इत्यादी घेतले व विद्यार्थ्यांचाही त्यासाठी उत्स्फूर्त सहभाग होता व मनापासून विद्यार्थी योगासनाचा आनंद घेत होते.
योग दिनानिमित्त प्रशालेतील प्रचिती घोगरे, श्रावणी कचरे, आर्या शिर्के, तनिष्का जाधव देशमुख या विद्यार्थ्यांनी पारंपारिक योगा, रिदमिक योगा व आर्टिस्टिक योगा सादर केला.
संगीत शिक्षक श्री.आशिष गावडे सर यांनी संगीता विषयी सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली ,शब्दरचना, चाल लावणे यापासून संगीत बनते विद्यार्थ्यांकडून शब्द घेऊन त्यापासून त्यांनी नवीन गाणे तयार करून वाद्यासह गायले, संगीताचे वेगवेगळे प्रकार सादर केले, त्यामध्ये बॉलीवूड म्युझिक, वेस्टर्न म्युझिक, क्लासिकल म्युझिक, हिपहॉप म्युझिक, गायनातून व वाद्य वाजवून सादर केले तसेच संगीतामुळे आपल्या जीवनातील ताण तणाव दूर होतो हेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
संस्थेचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर सर यांनी विद्यार्थ्यांना योग व संगीत यांचा दैनंदिन जीवनात दररोज आनंद घ्यावा असे अनमोल मार्गदर्शन केले.
योग दिनाचे औचित्य साधून संस्थेचे मुख्य सल्लागार माननीय श्री. प्रदीप गुरव सर व संस्थेचे प्रशासक श्री. गणेश पवार सर यांनी स्वतः 2200 विद्यार्थ्यांसोबत योगासने केली व संगीताचाही आनंद घेतला.
*आरोग्यम् धनसंपदा* या उक्तीप्रमाणे मनुष्य जीवन सुखी करायचे असेल तर सर्वांनी योगा करावा व स्वतःला आनंदी ठेवायचे असेल तर संगीत ऐकावे असा सल्ला संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. श्रीमंत ढोले सर व संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य श्री. सरगर सर, प्रशासक श्री. गणेश पवार सर,सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

