shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तहसील चा पीएम किसान कक्ष असून अडचण नसून खोळंबा..!!



(शेतकऱ्यांना माराव्या लागतात शंभर चकरा)

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-
केज तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या हितासाठी कक्ष स्थापन करण्यात आला. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी यामधील अडचणी दूर करण्यासाठी हा कक्ष काम करेल यासाठी सुरू करण्यात आला. मात्र रोज शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एका कामासाठी किमान 50 चकरा मारावा लागत असतील तर हा कक्ष म्हणजे असून अडचण आणि नसून खोळांबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नावातील दुरुस्ती बँकेचे खाते नंबर दुरुस्त करणे अशा अन्य अडचणी सोडवण्यासाठी या कक्षाने काम करायला हवे. पण तसे होताना दिसत नाही या कक्षात काम करणाऱ्या कर्मचारी शेतकऱ्यांना उर्मटपणे बोलत आहेत. 2000 निधी हप्ता खात्यावर पडावा म्हणून 50 चकरा लागत आहेत.

या विभागाला तहसीलदारांनी सूचना कराव्यात . शेतकऱ्यांचे काम सुरळीतपणे व्हावे यासाठी सर्व सूचनांचे पालन करण्याचे संबंधित विभागाला कळवायला हवे अन्यथा शेतकरी हे तहसील कक्ष कर्मचारी विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

तक्रार निवारण कक्षाच्याच तक्रारी

या कक्षाकडे आपली तक्रार घेऊन शेतकरी गेल्यानंतर त्यांचे तक्रार निवारण न होता केवळ त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यांचे काम केले जात नाही . जा तुम्हाला काय करून घ्यायचे ते घ्या अशा शब्दात शेतकऱ्यांना बोलले जाते . हा विभाग तक्रार विभाग बनला आहे. 

---------
close