shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आषाढी एकादशी च्या दिवशी पुर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कुर्बानी व चिकन मटन शॉप बंद ठेवावे: लबडे महाराज

शेवगाव। :-
आषाढी एकादशी च्या दिवशी शेवगाव तालुक्यासह पुर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कुर्बानी व चिकन मटन शॉप बंद ठेवावे या साठी सकल हिंदू समाज शेवगाव तालुका यांच्या वतीने आज मा. पोलीस अधीक्षक साहेब अहिल्यादेवी नगर यांना निवेदन देण्यात आले.


 दि. २९- जुन 23 आषाढी एकादशी आणी बकरी ईद असल्या कारणाने त्या दिवशी (२९- जून-23) अनगर जिल्हा व शेवगाव तालुक्यातील कुरबानी व चिकन मटन शॉप बंद ठेवावे हि सकल हिंदू समाज शेवगाव च्या वतीने करण्यात येत आहे असे निवेदनात म्हटले. 
अखंड हिंदुस्थान चे श्रद्धास्थान विठ्ठल रुक्मिणी व सर्वात मोठी पवित्र एकादशी या दिवशी देशातील लाखो भाविक वारकरी पंढरपूर ला जातात व कोट्यावधी भाविक एकादशी धरतात याच दिवशी बकरी ईद येते या कारणांमुळे त्यादिवशी मुस्लिम समाज बांधव कुर्बानी देतात त्यादिवशी न देता दुसऱ्या दिवशी द्यावी अशी विनंती सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना लबडे महाराजांनी केली.


यावेळी मराठा भुषण चंद्रकांत महाराज लबडे, सुहास लहासे, चंद्रकांत रसाळ, योगेश नाबगे, अर्जुन बढे, बंटी म्हस्के, ज्ञानेश्वर कबाडी, नितेश गटकळ सह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close