एम. जे. एज्युकेशनल फाउंडेशन बाल विकास केंद्र, इंदापूरच्या वतीने भटक्या व निराधार लोकांच्या पालावरती जाऊन शिक्षणाचे महत्त्व सांगणारे शिबिर संपन्न.
निराधार व गरीब मुलांसाठी मोफत शिक्षण व राहण्याची सोय - मनेश जाधव.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ६ जुलै, २०२३ रोजी, एम. जे. एज्युकेशनल फाउंडेशन बाल विकास केंद्र, इंदापूर, जिल्हा पुणे.
यांच्या माध्यमातून भटक्या व निराधार लोकांच्या पालावरती जाऊन शिक्षणाचे महत्त्व सांगणारे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एम जे एज्युकेशनल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मनेश जाधव सर यांनी सांगितले.
तसेच तसेच ते पुढे म्हणाले की, भटका समाज आपल्या उदरनिर्वाहासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करत असतो आणि या भटकंतीमुळे त्यांच्या मुलांचीही फरपट होत असते आणि या भटकंतीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात व त्यांचं आयुष्य गुलामगिरीत व अतिशय दारिद्र्यात जगावे लागतं.
अशा लोकांची भटकंती थांबत नसल्यामुळे त्यांच्या मुलांसाठी व निराधार मुलांसाठी मोफत शिक्षण व राहण्याची सोय एम जे एज्युकेशनल फाउंडेशन ने बाल विकास केंद्र द्वारे उपलब्ध केले आहे व त्याचा लाभ निराधार अनाथ व अतिशय गरीब मुलांना होऊ शकतो .अशा प्रकारचे उपक्रम राबवून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना एक स्वाभिमानाचे जगणं देण्यासाठी सरकारने व अनेक वेगवेगळ्या संस्थानी पुढे येऊन असे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. शिक्षण हाच जीवनाचा खरा आधार आहे. शिक्षण नसेल तर जगण्यासाठी धाडस व स्वाभिमान मिळणार नाही.
निराधार व अतिशय गरीब मुलांसाठी एम.जे. एज्युकेशनल फाउंडेशन खूप ताकतीने व आत्मविश्वासाने काम करेल.

