बांडेवाडी शाळेतील मुलांनी केली उजनी काठची सफर..
पळसनाथ मंदिर , पाण्यातील मासे , शंख शिंपले पाहून मुले आनंदली.
इंदापूर प्रतिनिधी:दि ८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथील मुले व शिक्षकांनी उजनी जलाशयातील पाणी कमी झाल्याने जुने हेमाडपंथी पळसनाथ मंदिर उघडे झाल्याने भेट देऊन मंदिर परिसर पाहणी केली व वनभोजनचा आनंद घेतला.
उजनी धरण झाल्यापासून पाण्यात असलेले मंदिर काही वर्षानी पाऊस लांबल्यावर उघडे होते. त्यावेळी परिसरातील नव्हे तर पुण्यापासून पर्यटक मंदिर पाहण्यासाठी येतात. याहीवर्षी मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. शनिवार रविवार सुट्टी दिवशी हा परिसर पर्यटकांनी फुलुन येतो. मंदिरात जाण्यासाठी होडीने जावे लागते. शाळेतील मुलांनी त्या ठिकाणी मनसोक्त आनंद उड्या मारत शंख , शिपले , मासे , पाहण्यात दंग झाली. यावेळी बरोबर आणलेले जेवणावर एकत्रित पणे ताव मारला. वनभोजनचा आनंद घेतला.यावेळी शिक्षक , पालक व मुले उपस्थित होते.

