माझी दुनिया..!!
माझ्या दुनियेत बरा आहे मी
स्वच्छ पाण्याचा झरा आहे मी
आजही डोळ्यांत हास्य मिशीवर ताव आहे
तावुन सलाखुन घ्या कोहीनुर हिरा आहे मी
माणवतेला जोडणारा दोरा आहे मी
काय नाय हो.. मनाने खरा आहे मी
मी बदलुन दाखवेन हे सुर्य चंद्र तारे
विद्रोही वादळातला वारा आहे मी
शञुलाही माहीत धमक फार आहे
दुश्मनांचाही.. खुप प्यारा आहे मी
एकटाच तुडवतो ही वाट संघर्षाची
तथागताचा समतेचा नारा आहे मी
असेल कोणी क्रिकेट जगतातला देव
क्रिकेट जगताचा ब्रायन लारा आहे मी
हातावर जळता सुर्य घेवुन निघालो
उष्माघात मोजणारा पारा आहे मी
जगाच्या पोशिंद्यासाठी हंबरते लेखणी
मुक्या प्राण्यांसाठी हिरवा चारा आहे मी
धार लावुन घेतले मी शब्दांना किती तरी
धर्मांद नराधमांसाठी दुधारी सुरा आहे मी
किती जखमा कागदावर लिहील्या
वरुन काळा आतुन गोरा आहे मी
लोकांनी मिठा सारखा वापरला मला
समुद्राच्या पाण्याहुन खारा आहे मी
जर तर च्या बाता मी करत नाही कधिच
अजूनही कागदासारखा कोरा आहे मी
हि सुरुवात आहे मी झळकणार भु वरी
स्वयंप्रकाशीत लखलखता तारा आहे मी
माझ्या दुनियेत बरा आहे मी
स्वच्छ पाण्याचा झरा आहे मी
आकाश सुपारे
9822510254

