राजेंद्र बनकर - शिर्डी
आशिया खंडातील सर्वात मोठे मेगा किचन म्हणून ओळख असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयातील जेवणाचा स्वाद महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना इतका आवडला की, त्यांनी थेट जेवण बनविणाऱ्या दोन्ही आचाऱ्यांना थेट दिल्लीला राष्ट्रपती भवनात जेवण बनविण्यासाठी बोलविले असून तशा आशयाचे पत्र त्यांनी श्री साईबाबा संस्थान प्रशासनाला दिले असून त्याची तात्काळ दखल घेऊन श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने प्रसाद गोरक्षनाथ कर्डिले व रवींद्र गंगाधर वहाडणे या दोन्ही आचाऱ्यांना दिल्ली येथे पाठविण्याची परवानगी दिली आहे.
खरं तर ही भारतातील पहिलीच घटना म्हणावी लागेल कारण मागील महिन्यातच महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू या साईबाबा समाधी दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या, त्यांनी श्री साईबाबा मंदिरात पाद्यपूजा करून बाबांच्या विषयी सर्व माहिती जाणून घेतली त्यानंतर थेट जेवणासाठी त्या साईप्रसादालयात गेल्या, त्याठिकाणी त्यांच्यासाठी महाराष्ट्रीयन पद्धतीच्या काही भाज्या, ्भाकरी ई. पदार्थ बनवण्यात आले होते. त्या जेवणाचा स्वाद घेताना त्यांना त्या स्वादाची इतकी भुरळ पडली की, त्यांनी थेट जेवण बनविणाऱ्या अचाऱ्यांना दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात जेवण बनविण्यासाठी बोळवण धाडलं असून अशा आशयाच पत्र श्री साईबाबा संस्थानला त्यांनी दिलं असून श्रीसाईबाबा संस्थान प्रशासनाने या दोनही आचाऱ्यांना दिल्लीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीसाईबाबा संस्थानच्या दृष्टीने व शिर्डीच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण घटना मानली जात असून शिर्डी व परिसरात कर्डिले व वाहाडणे या दोनही आचाऱ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत असून श्रीसाईबाबा संस्थांनच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -9561174111

