shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाविद्यालये ज्ञानाची शिदोरी देणारी संस्कार केंद्रे आहेत. आनंद भोईटे

महाविद्यालये ज्ञानाची शिदोरी देणारी संस्कार केंद्रे आहेत. आनंद भोईटे 
    
इंदापूर प्रतिनिधी:श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, छत्रपती महाविद्यालय भवानीनगर येथे बारामती ग्रामीण विभागाचे कर्तबगार व कर्तव्यदक्ष अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे साहेब यांनी महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान महाविद्यालयात होणाऱ्या नॅक मूल्यांकन संदर्भात सुरु असलेल्या पाहणी केली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांशी सुसंवाद व मार्गदर्शन साधताना ते म्हणाले, महाविद्यालये ही संस्काराची केंद्रे असून तिथे ज्ञान ग्रहण करण्यासाठी येणाऱ्या विध्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य अशी दिशा प्राध्यापक देत असतात.महाविद्यालये ही ज्ञानची असणारी मंदिरे संस्काराची ऊर्जा अन् प्रेरणा केंद्रे बनली पाहिजेत.महाविद्यालयीन शिक्षण देताना विध्यार्थ्यानी जीवन सुंदर आणि यशस्वी करण्यासाठी प्राध्यापकांनी प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे.आजच्या माहिती तंत्रज्ञान व स्पर्धात्मक युगात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मनातील नकारात्मक विचारांची मरगळ झटकून अंहकार टाळून सकारात्मक दृष्टीने विचार करून आपल्या कामाचा उत्साह वाढवावा असे आवाहन श्री आनंद भोईटे साहेबांनी केले. यावेळी महाविद्यालयातील नॅक मूल्यांकन कामाच्या संदर्भात पाहणी करते वेळी सुरु असलेल्या कामाप्रती त्यांनी समाधान व्यक्त केले.
          या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे, उपप्राचार्य डॉ. संजय मोरे.कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.
close