shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे आठभाई मळा येथील तरुणांनी श्री क्षेत्र आरणगाव येथून ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी केली चहा व नाष्ट्याची सोय.

इंदापूर येथे आठभाई मळा येथील तरुणांनी श्री क्षेत्र आरणगाव येथून ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी केली चहा व नाष्ट्याची सोय.

प्रथमच असा उपक्रम राबवल्याबद्दल विठ्ठल ननवरे ,सुरेश गवळी, दादासाहेब सोनवणे यांनी केले तरुणांचे कौतुक.
इंदापूर प्रतिनिधी: श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र अरणगाव या पावण भुमितून ज्योत घेऊन येणाऱ्या सर्व भाविकांसाठी इंदापूर येथे पुणे-सोलापुर हायवे वरती आठभाई मळा येथील तरुणांनी चहा व नाष्ट्याची सोय केली होती. प्रथमच असा उपक्रम राबवल्याबद्दल माझे नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे माझी नगराध्यक्ष सुरेश गवळी माझी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी सदर युवकांचे त्या ठिकाणी जाऊन कौतुक केले.

यावेळी विकास शिंदे, युवराज शिंदे, विष्णू शिंदे, नागेश शिंदे, रामचंद्र शिंदे,  राजु शिंदे, तुकाराम शिंदे, तुषार शिंदे,  सुरज शिंदे, बापू शिंदे, संदेश शिंदे, भिबिषन देवकर, तुषार ढगे, अक्षय शिंदे तसेच समाजातील सर्व कार्यकर्ते व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
close