नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
राहाता येथील डॉ गोरे हॉस्पिटल येथे स्कॉटलंड येथील मुळव्याध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णावर लेझरद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
राहाता येथील प्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉ. किरण गोरे यांनी स्कॉटलंड येथील रुग्णावर नुकतीच लेझरद्वारे मुळव्याध ( पाइल्स ) आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाला या आजारापासून दिलाचा दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्कॉटलंड येथील रुग्णाला मुळव्याध ( पाइल्सचा) मोठ्या प्रमाणात त्रास जाणवत होता. स्कॉटलंड व भारतातील अनेक मुळव्याध तज्ञांना या रुग्णाने या आजारासंबंधी उपचार घेतला परंतु रुग्णाचा या आजारा संबंधीचा त्रास कमी झाला नाही.
त्यामुळे रुग्णाने सोशल मीडियावर वेबसाईटद्वारे राहाता येथील प्रसिद्ध मुळव्याध तज्ञ डॉ. किरण गोरे यांची मुळव्याध संबंधी आजाराबाबत माहिती जाणून घेऊन डॉ. गोरे यांच्याशी या आजाराबाबत चर्चा केल्यानंतर स्कॉटलंड येथून थेट शिर्डी येथे विमानाने येऊन राहाता येथील डॉ. गोरे हॉस्पिटल येथे मुळव्याध संबंधी पाइल्स आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल झाले.
डॉ किरण गोरे यांनी तात्काळ या रुग्णावर लेझर द्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाला तात्काळ या आजारापासून दिलाचा दिल्याने स्कॉटलंड येथील रुग्णाने किरण गोरे यांचे आभार मानले. राहाता येथील प्रसिद्ध मुळव्याध डॉ. किरण गोरे यांनी हजारो रुग्णांना व्हेरिकोवेन्स, मुळव्याध, पाइल्स, फिशर, भगंदर, पोट विकार आशा आजारासंबंधी लेझरद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे काम करत असल्याने अल्पावधी काळात मुळव्याध तज्ञ म्हणून डॉ किरण गोरे हे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात.

