shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संरक्षित शेती या घटकाकरिता साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणान्या कंपन्यांनी १४ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा :
 संरक्षित शेती या घटकाकरिता साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची नोंदणी प्रक्रिया महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांचे मार्फत राबविण्यात येत आहे. नोंदणी प्रक्रिया राबविण्यासाठी अटी व शतीच्या अधिन राहून उत्पादक कंपन्यानी नोंदणीसाठीचे प्रस्ताव १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


महाराष्ट्र राज्य शासनामार्फत संरक्षित शेती तंत्रज्ञानास कृषि विभागाच्या विविध योजनेच्या माध्यमातून शेतकन्यांना अर्थसहाय्य देऊन प्रोत्साहन दिले जाते. संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर, डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट या घटकाचा समावेश आहे. कृषि विभागाच्या योजनेतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे साहित्य पुरवठा व्हावे, साहित्याची गॅरंटी वारंटी, याबाबत हमी मिळावी यादृष्टीने पॉलीफिल्म, टेपनेट, मोनोनेट, इन्सेक्ट नेट, अॅप्रॉन पेपर, प्लास्टिक आच्छादन, जीआय पाईप, द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर व डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेलनेट कव्हर या साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांची उत्पादक कंपन्यांच्या नोंदणी प्रक्रियेबाबतची अटी, शर्ती व इतर तपशिल कृषि विभागाच्या www.mahanhm.in या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर -
9561174111
close